शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बिलाच्या मागणीसाठी शेवगाव नगरपालिकेत घुसवला घोडा

By admin | Updated: May 11, 2017 17:24 IST

शेवगाव नगरपरिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात घोड्याला नेण्यात आले. तिथेच त्यांनी ठिय्या दिला.

आॅनलाइन लोकमतशेवगाव (अहमदनगर) दि़ ११ - शेवगाव नगरपरिषदेमार्फत केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम मिळावी, या मागणीसाठी भाकपचे युवा कार्यकर्ते कॉ. संजय नांगरे, चंद्रभान नांगरे यांनी घोड्यासह नगरपरिषदेच्या दालनात गुरुवारी अनोखे बिल मागणी आंदोलन केले. नांगरे बंधुंनी केलेले हे आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरले.शेवगाव नगरपरिषदेने परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेत चंद्रभान भगवान नांगरे यांनी नगरपरिषदेची निविदा दाखल केली होती. ती मंजूर झाल्यानंतर नांगरे यांनी घोड्यावर बसून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे ६० दिवस काम केले. या कामाच्या बिलाची रक्कम वारंवार मागणी करूनही न दिल्याने संजय नांगरे व त्यांचा भाऊ चंद्रभान यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात घोड्यासह बिल मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्धार जाहीर केला होता. मात्र या इशाऱ्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे गुरुवारी शेवगाव नगरपरिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात घोड्याला नेण्यात आले. तिथेच त्यांनी ठिय्या दिला. घोड्याला जिन्यातून दुसऱ्या मजल्यावर नेताना आंदोलनकर्त्यांची एकच धांदल उडाली. या आंदोलनाची शेवगावात रंगतदार चर्चा झडली.नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुधा कुरणावळ यांनी येत्या आठवडाभरात निर्णायक कार्यवाही करण्याचे मान्य केल्यानंतर तब्बल तासभर सुरु असलेले हे अनोखे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी कुरनावळ यांनी याबाबत तातडीने दखल घेण्याचे मान्य केल्या नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.