देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे व्यवस्थापक संपतराव थेऊरकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त विविध संस्थांनी सन्मान केला.
थेऊरकर यांनी ४० वर्षांच्या सेवेत देवदैठण, बेलवंडी, काष्टी, जवळा, विसापूर, कोळगाव अशा विविध शाखांमध्ये काम केले. आज ते प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेचे शिक्षकवृंद तसेच उद्योजक अतुल लोखंडे, सुभाष वाघमारे, सुभाष राक्षे, मल्हारी वाखारे, डी. बी. कुसाळकर, माजी शिक्षणाधिकारी मनोहर वीर, हिंगणी, राजापूर, मेंगलवाडी, गव्हाणेवाडी, देवदैठण येथील सेवा सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, ग्रामस्थ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
---
३०देवदैठण सत्कार
300621\img_20210630_153414.jpg
देवदैठण येथील जिल्हा बँकेचे व्यवस्थापक संपतराव थेऊरकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान करताना मुख्याध्यापक संपतराव गाडेकर व शिक्षकवृंद . ( छायाचित्र - संदीप घावटे )