शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

नगरमध्ये घर खरेदी महागणार

By admin | Updated: April 2, 2016 00:35 IST

अहमदनगर : नगर शहरातील सदनिकांच्या रेडीरेकनर दरात सरासरी पाच ते आठ टक्के वाढ झाली आहे़़ मागील पाच वर्षांच्या तुलनेत ही वाढ कमी आहे़

अहमदनगर : नगर शहरातील सदनिकांच्या रेडीरेकनर दरात सरासरी पाच ते आठ टक्के वाढ झाली आहे़़ मागील पाच वर्षांच्या तुलनेत ही वाढ कमी आहे़ मध्यवर्ती शहरातील नवी पेठ, बोल्हेगाव, मनमाडरोड परिसरात आठ टक्के तर बालिकाश्रम रस्ता परिसरात नऊ आणि औरंगाबाद महामार्ग परिसरात सर्वाधिक दहा टक्के वाढ झाली आहे़ त्याखालोखाल पाईपलाईन, पुणे महामार्ग, केडगाव, बुरुडगाव उपनगरांत सात टक्के वाढ झाली आहे़ ही दरवाढ शुक्रवारपासून लागू झाल्याने सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न महाग झाले आहे़प्रत्येक वर्षीच्या १ जानेवारी रोजी नवीन रेडीरेकनरचे दर लागू केले जात होते़ यंदापासून ते नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी जाहीर करण्याचा निर्णय सरकारने डिसेंबरमध्ये घेतला होता़ त्यानुसार सरकारने शुक्रवारी नवीन दराची घोषणा केली़ राज्यात सरासरी सात टक्के दरवाढ झाली़ परंतु नगर शहरात रेडीरेकनरचे दर ५ ते १० टक्के इतके वाढले आहेत़ सर्वाधिक दरवाढ औरंगाबाद महामार्ग परिसरात झाली आहे़ त्या तुलनेत चितळेरोड, दिल्लीगेट, जुना कापडबाजार, नागापूर शिवरस्ता, बुरुडगाव, पुणे बाह्यवळण रस्ता, दौंडरोड, पुणे महामार्ग आणि भिस्तबाग चौक परिसरात नाममात्र म्हणजे ५ ते ७ टक्क्यांची वाढ झाली आहे़ औरंगाबाद, मनमाड आणि बोल्हेगाव परिसरातील घर खरेदी महागली आहे़ पण, इतर उपनगरांत घर खरेदी करणाऱ्यांना या दरवाढीची झळ बसणार नाही़ भूखंडाच्या रेडीरेकनर दरात सरासरी सात टक्के वाढ झाली आहे़ शहरात जमीन घेणाऱ्यांनाही वाढीव दराने कर भरावा लागणार आहे़ (प्रतिनिधी)