टीडीफ संघटनेचे प्रदेश कार्यवाह हिरालाल पगडाल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. संगमनेर तालुका शिक्षकेतर सेवक संघाचे अध्यक्ष अर्जुन वाळके, उपाध्यक्ष भाऊसाहेब शेटे, सचिव रवींद्र भालेराव, मुख्याध्यापक संघटनेचे अरविंद कडलग, शांताराम डोंगरे, भारत सातपुते, रघुनाथ जगताप, पद्माकर गोसावी, नंदू भालारे, नंदू डाके, विलास सोनवणे, विश्वनाथ भालेराव, दिलखुश रहाणे, विलास सोनवणे, शिवनाथ कोटकर, रिजवान शेख, बी. एस. कदम, सुनील यादव जमीर मणियार, सुनील कवडे, गोरख निळे, सतीश चंदन, भाऊसाहेब बोंबले, संजय ढगे, रवींद्र पेढेकर, बाबासाहेब वर्पे यांसह शिक्षकेतर कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवा. शासन नियुक्त समितीने शिफारस केल्यानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनुकंपासह तात्काळ पद भरती करावी. माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बक्षी समितीने शिफारस केल्याप्रमाणे लाभ तात्काळ लागू करावा. माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी २४ वर्षांच्या लाभाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पदोन्नतीस व अनुकंपा नियुक्तीस तात्काळ मान्यता देण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले.
---------
फोटो नेम : ‘११ डिसेंबर’च्या शासन निर्णय होळी, संगमनेर
ओळ : राज्यातील माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ नियुक्तीस स्थगिती देणाऱ्या शासन निर्णयाची संगमनेर तहसील कचेरीसमोर होळी करण्यात आली.