विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याचे मयत कामगार आनंदा दगडू शिंदे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली. शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी कारखान्याचे वतीने त्यांच्या कुटुंबाला २ लाख ४७ हजार ९१५ रुपयांची मदत करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते शोभा आनंदा शिंदे यांना मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी युवक कार्यकर्ते पप्पू शिंदे, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड, कामगार संघटनेचे अध्यक्ष कल्याण पाटील जगताप, लेखापाल नारायण सरोदे, कार्यालय अधीक्षक रामदास शेटे, पिंपळगाव पिसा ग्रामपंचायतीच्या सदस्या रंजनाबाई भालके आदी उपस्थित होते.
जगताप कारखान्याकडून कामगाराच्या कुटुंबाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:20 IST