जून महिन्यापासून तालुक्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते; पण सुरुवातीला पावसाचे वेळेवर आगमन झाल्यानंतर पावसाचे अचानक उघडीप दिली. त्यामुळे यावर्षी खरिपाची पिके वाया जातात की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली होती. १५ जूननंतर राहाता तालुक्यात सलग पाऊस न पडता ठिकठिकाणी पडत असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची मशागत करण्यास सुरुवात केली.
जवळपास ८५ मिलिमीटर पाऊस झाल्यावर राहाता तालुक्यातील पेरणीलायक असलेले ३८ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्रापैकी १३ हजार हेक्टर क्षेत्रावर जवळपास ३० टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली; परंतु १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरलेले बियाणे व रासायनिक खतांचा खर्च व पुन्हा दुबार पेरणीचे संकट येण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. गुरुवार, शुक्रवार, शनिवार राहाता तालुक्यातील लोणी, बाभळेश्वर, आडगाव, केलवड, खडकेवाके, गोगलगाव, रांजणगाव, रामपूरवाडी, वाकडी, पुणतांबा, चितळी, शिर्डी, राहाता या गावांमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस पडला.
100721\img-20210710-wa0118.jpg
राहाता तालुक्यात झिमझिम पावसाने जीवदान मिळालेले सोयाबीन