शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस

By admin | Updated: July 18, 2014 01:39 IST

राजूर : भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे सातत्य टिकून असून, पावसाचा जोरही वाढला आहे.

राजूर : भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे सातत्य टिकून असून, पावसाचा जोरही वाढला आहे. रतनवाडी येथे या मोसमातील सर्वाधिक म्हणजेच साडेसात इंच, तर घाटघर येथे पावणेसहा इंच पावसाची नोंद झाली.मंगळवारपासून मुळा, भंडारदराच्या खोऱ्यात पावसाने विश्रांतीनंतर पुन्हा आगमन केले. मागील आठवड्यातही घाटघरला १४८ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र त्यानंतर सलग तीन दिवस पाऊस कमी होत गेला. मात्र मंगळवारपासून पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला. त्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा ओल्याचिंब झाल्या असून, गिरी शिखरावरून धबधबेही कोसळू लागले आहेत. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर या परिसराला साजेशा पावसाची नोंद सकाळी संपलेल्या चोवीस तासांत झाली. त्यामुळे भंडारदरा धरणातील पाण्याची आवकही झपाट्याने वाढत आहे. सकाळी संपलेल्या चोवीस तासात३१० दलघफू नवीन पाणी आले. त्यामुळे आता भंडारदरा धरणाने एक टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. सकाळी धरणातील पाणीसाठा १ हजार २० दलघफू होता. हरिश्चंद्र गडाच्या पर्वतरांगातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मुळा नदीचा विसर्ग वाढून २ हजार ६३५ क्युसेक झाला. रतनवाडी ५७८, घाटघर ७८९, भंडारदरा १९०, पांजरे ३१८, तरवाकी १३७.राजूर, कोतूळ, अकोले व आढळा परिसरात मात्र अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)गुरुवारच्या बारा तासात भंडारदरा येथे ३३ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणात २२३ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे एकूण साठा १२१९ दलघफूटापर्यंत पोहचला. धरणातून ५५६ क्युसेकने पाणी सोडण्यात येत असल्यामुळे निळवंडे धरणातील पाणी साठा ४०४ दलघफू होता.