अहमदनगर : भिंगार शहरातील पंडित हॉस्पिटलच्या वतीने स्व.डॉ. सविता पंडित यांच्या स्मरणार्थ सवलतीच्या दरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २९ जानेवारीपर्यंत असल्याची माहिती डॉ. ऋषिकेश पंडित यांनी दिली. शिबिराचे हे सहावे वर्ष असून, या शिबिरात महिलांच्या विविध आजारांची तपासणी करून गरजूंची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये गर्भाशय न काढता गाठी काढणे, गर्भाशय काढणे, गर्भनलिकेतील ब्लॉकेज काढणे, गर्भाशयातील पडदा काढणे, प्रॉलॉप्स सर्जरी, वंध्यत्व निवारण सर्जरी, कॉस्मेटिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी आदी प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. २७ जानेवारीला सुरू झालेल्या शिबिरात आतापर्यंत ९२ रुग्णांची तपासणी करण्यात आली असल्याचे डॉ. ऋषिकेश पंडित यांनी दिली. या शिबिराचा जास्तीतजास्त गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे. (वा.प्र.)
---
फोटो- २८ पंडित हॉस्पिटल