शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

अरोळे हॉस्पिटलच्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST

जामखेड : डॉ. अरोळे हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करत आहे. त्यामुळे सरकार, प्रशासनाने त्यांच्या अडचणी दूर करायला हव्यात. ...

जामखेड : डॉ. अरोळे हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करत आहे. त्यामुळे सरकार, प्रशासनाने त्यांच्या अडचणी दूर करायला हव्यात. येथे ऑक्सिजन, जनरेटरसाठीच्या डिझेलची कमतरता असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून समजले. या व इतर अडचणी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसमाेर मांडणार आहे. येथे अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी यावेळी दिली.

तालुक्यातील कोरोनाचे वाढते रुग्ण, डॉ. अरोळे कोविड हॉस्पिटलच्या असणाऱ्या समस्या, बाधित रुग्णांची विचारपूस केल्यानंतर शिंदे यांनी डॉ. अरोळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोभा अरोळे व रवी अरोळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी रवी अरोळे यांनी हॉस्पिटलमधे सध्या २३९ रुग्ण उपचार घेत आहेत. उन्हाळा असल्याने उष्णता वाढली आहे. यामुळे वीज गेल्यावर जनरेटर तासन्‌तास चालू ठेवावे लागते. त्यासाठी लागणाऱ्या डिझेलसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. तसेच २३९ बाधित रुग्णांपैकी ५५ रुग्णाला दररोज ४९ ऑक्सिजन सिलिंडर लागत आहेत. यासाठीही खर्च होतो, असे त्यांनी शिंदे यांना सांगितले.

त्यानंतर शिंदे म्हणाले, डॉ. अरोळे कोविड हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करत आहे. त्यासाठी त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. येथील अडचणींसाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, विधि जिल्हा अध्यक्ष प्रवीण सानप, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, प्रवीण चोरडिया, मनोज कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, प्रसिद्धीप्रमुख उद्धव हुलगुंडे, डॉ. अलताब शेख, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, गोरख घनवट, राजेंद्र म्हेत्रे, ईश्वर हुलगुंडे, आप्पासाहेब ढगे, मोहन गडदे आदी उपस्थित होते.

--

०१ जामखेड शिंदे

जामखेड येथील अरोळे कोविड सेंटरला माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.