कोरोनाच्या जागतिक महामारीत तर डॉक्टर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या बरोबरीने आरोग्यसेवक हा सर्वच आघाड्यांवर लढत आहे. परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्ती, कोविड संशयित व्यक्ती, संपर्कात आलेली व्यक्ती यांना क्वारंटाइन करणे. लोकांचे अज्ञान दूर करून त्यांना टेस्ट करण्यासाठी आणणे, हे कार्य तर गावपातळीवरील राजकारण सांभाळून पार पाडावे लागत आहे.
ग्रामीण भागात लसीकरणाचे महत्त्व सांगून लसीकरण घडवून आणण्यात त्याचाही खारीचा वाटा आहे. जवळपास दीड वर्षापासून कोणतीही सुटी न घेता तो सेवा देत आहे. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आरोग्यसेवक रोज मृत्यूच्या दारात झुंज देत आहे.
................
सर्व आघाड्यांवर लढूनही आरोग्यसेवक आज शासन दरबारी उपेक्षितच आहे. महिन्याचा पगार कधी वेळेवर होत नाही. मेडिकल बिल मंजूर होत नाही. पेन्शन नाही, वेळेवर प्रमोशन नाही. सेवा ज्येष्ठता लाभ नाही. कित्येक दिवसांपासून शासन दरबारी मागण्या धूळखात पडून आहेत.
- गणेश चणे, राज्य संघटक, राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना महाराष्ट्र
...............
०१ चणे