अहमदनगर - राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराजांचे शिष्य, उपाध्याय, परमपूज्य प्रवीणऋषीजी महाराज यांनी पुणे येथील ऐतिहासिक चातुर्मास पूर्ण करुन विहार करीत अहमदनगर येथे प्रवेश केला. येथील धार्मिक परीक्षा बोर्ड, आनंदधाम येथे विराजित श्रमण संघीय प्रवर्तक परम पूज्य कुंदनऋषीजी महाराज यांच्यासह नगरमधील साधु-संतांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आणि तात्काळ पुढील धर्मयात्रा प्रारंभ केली. उपाध्यायश्रीचा कडामार्गे २२ डिसेंबरपर्यंत आचार्य आनंदऋषीजी महाराजांची दीक्षाभूमी मिरी येथे पोहोचण्याचा मानस आहे. २३ डिसेंबर मार्गशीर्ष शुक्ल नवमी हा आचार्यश्रींचा दीक्षा दिवस आहे. या दिवशी मिरी येथे उत्साह सोहळा साजरा केला जातो. महाराष्ट्रातील विचारणात उपाध्यायश्री यादिनी मिरी येथे आवर्जून उपस्थित असतात. यंदा दीक्षा दिनी ‘आनंद गुरु दुजा ना कोय’ ही ‘एकच गुरु’ ची संकल्पना राबवीत ‘श्री गुरु आनंद मंत्रदीक्षाचे आयोजन करण्यात येत आहे. आजच्या वेगाने बदलत जाणाऱ्या जीवनशैलीत, तंत्रज्ञान व मोबाईलच्या विळख्यात भरकट जाणाऱ्या मनाला दिशा देण्यासाठी, स्थिर करण्यासाठी समर्थ गुरुचे कृपाछत्र उपलब्ध करून देणे हे गुरुमंत्र दीक्षाचे आयोजन केले आहे. हे अनुष्ठान ऑनलाईन व ऑफलाईन (कार्यक्रम स्थळी) दोन्ही प्रकारे होणार असून या उपक्रमाशी जुडण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. हा उपक्रम निशुल्क असला तरी नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अनुष्ठानासाठी नावनोंदणी करणाऱ्यांना गुरुमंत्र कार्ड घरपोच कुरिअर करण्यात येतील, अशी माहिती आनंदतीर्थ परिवार अहमदनगरतर्फे देण्यात आली आहे.
प्रवीणऋषीजी महाराजांच्या उपस्थितीत गुरूमंत्र दीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:45 IST