शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गुरुकृपेने भाविकांचा उध्दार

By admin | Updated: April 22, 2016 00:10 IST

भेंडा : गुरूवर निष्ठा ठेऊन एकलव्याने जादा ज्ञान मिळवले. कृष्णचरित्र गुरूशिवाय समजणे कठीण आहे. सांदीपनी ऋषी कृष्णाचे गुरू होते.

भेंडा : गुरूवर निष्ठा ठेऊन एकलव्याने जादा ज्ञान मिळवले. कृष्णचरित्र गुरूशिवाय समजणे कठीण आहे. सांदीपनी ऋषी कृष्णाचे गुरू होते. गुरूकृपेने उध्दार होतो, असा उपदेश केशव महाराज उखळीकर यांनी केला.भेंडा (ता नेवासा) येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त नागेबाबा परिवार व श्रीराम सेवा मंडळ आयोजित भागवत कथेत भागवताचार्य केशव महाराज उखळीकर बोलत होते.ते म्हणाले, संताची सेवा देवाला आवडते. संत दुर्जनाला सज्जन बनवितात. देव दुर्जनाचा संहार करतात. देव पाहण्याची नाही तर अनुभवण्याची वस्तू आहे. रामचरित्रात शंका घेता येत नाही. कृष्णचरित्रात शंकेला वाव आहे. शक्ती व भक्तीचा देव बजरंग बली आहे. जीव अर्पण केल्याशिवाय देव प्राप्त होत नाही.भारत देश संस्कृती, ज्ञान, विरक्ती, पराक्रम, विद्या व स्वराज्याच्यादृष्टीने प्रगत होता. नालंदा विद्यापीठात १४ विद्या शिकवल्या जात होत्या. परदेशातील लोक विद्या घेण्यासाठी भारतात येत होते. परंतु भारतीय लोकांचेच देश, देव व धर्माबद्दल प्रेम संपल्याने आजची स्थिती निर्माण झाली. तुम्ही देश, धर्मासाठी काय केले याचा विचार करा. द्वारकेत राज्य स्थापनेनंतर कृष्णाने यज्ञ केला. सतराजीकाचा सेमंतक मणी चोरण्याचा आळ भगवंतावर आला. मण्याचा शोध घेतांना जांबुवंताशी युद्ध, जांबुवंती, सत्यभामेशी विवाह, जरासंध,शिशुपाल, दंतवक्र वध प्रसंगाचे वर्णन उखळीकर महाराजांनी केले. यावेळी श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज, बाळू महाराज कानडे, रामभाऊ गोल्हार, अण्णा भगत, सुदाम बनसोडे, बलभीम फुलारी, अशोक वायकर,कारभारी गायके, डॉ.कविता मुळे, उज्ज्वला भुसारी, राखी पोखर्णा, वर्षा शेलार, मीना मडके, कांता दुधाळ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कथेचे पटांगण व इतर सफाईची जबाबदारी सचिन देशमुख, रमेश आरणे, तिरमल समाजातील सुभाष फुलमाळी, विलास फुलमाळी, तात्या फुलमाळी, अण्णा फुलमाळी यांनी चोख बजावली. या भागवत कथेचा समारोप शुक्रवारी श्री हनुमान जयंतीच्या दिवशीे होणार आहे. (वार्ताहर )