तळेगाव दिघे : महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात देशाचे दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
तळेगाव दिघे विद्यालयात पुण्यतिथी निमित्ताने प्राचार्य एच. आर. दिघे व शिवाजी दिघे यांच्या हस्ते लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक संजय दिघे, चंद्रभान हापसे, बी. सी. दिघे, राधाकिसन दिघे, कैलास गिरी, तुकाराम सोळसे, दिलीप ताजणे, बाबासाहेब गागरे, प्रभाकर जोरी, प्रताप जोंधळे, सुनील दिघे, संजय आर. दिघे, महेश उगार, राम गायकवाड, भूषण जाधव, गोरख दिघे उपस्थित होते. बी. सी. दिघे यांनी सूत्रसंचालन केले.
...
फोटो : ११ शास्त्री पुण्यतिथी
...
ओळी : तळेगाव दिघे येथील विद्यालयात लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना प्राचार्य एच. आर. दिघे, शिवाजी दिघे, आदी उपस्थित होते.