पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पिपाडा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून होळकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण, गटनेते विजय सदाफळ आदी उपस्थित होते. पिपाडा म्हणाल्या, आजची स्त्री राजकारणात पुरुषांच्या बरोबरीने पाऊल टाकते आहे. परंतु अठराव्या शतकात अहिल्याबाई होळकर यांनी आपली गुणवत्ता व अधिकारांची जाणीव असलेले राजकारण केले. एक स्त्री जनतेच्या कल्याणासाठी आपल्या अधिकारांचा व सत्तेचा वापर किती प्रभावीपणे करू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर होत्या. अहिल्यादेवींना सत्तेवरून हटवण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु त्यांनी तो हाणून पाडला. प्रशासन कौशल्य व राजकारभारातील पकड, राजकीय द्रष्टेपणा, चाणाक्षपणा हे आजच्या स्त्रीयांनी अहिल्यादेवींकडून शिकणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:16 IST