लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : येथील समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी कुलदीप संदीप कोयटे याने केयॉन विझकिड्स या जागतिक पातळीवरील स्पर्धेत ‘व्यक्तिमत्त्व स्पर्धा’ या प्रकारात अंतिम टॉप १० स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले आहे.
केयॉन विझकिड्स ही एक नामांकित जागतिक संस्था आहे. या संस्थेतर्फे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी मागील २० वर्षांपासून विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये जगभरातील लाखो विद्यार्थी सहभाग घेतात. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी आंतरशालेय ते राष्ट्रीय स्तरांपर्यंत मजल मारावी लागते. या लाखो स्पर्धकांमधून राष्ट्रीय स्तरावर अंतिम स्पर्धेसाठी १० स्पर्धकांची निवड केली जाते. कुलदीपचे अभिनय कौशल्य, जतन केलेले छंद, आवड-निवड, स्वभाव, संभाषण कौशल्ये तसेच समता लिओ क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष म्हणून राबविलेल्या सामाजिक मोहिमा, पथनाट्ये सादरीकरण, अभिनयाचे उत्कृष्ट सादरीकरण व वक्तृत्वावर असलेली पकड, संगीत कलेतील गिटार वाजविण्याची कला असे विवध कलागुण पाहून त्यांचा टॉप १० स्पर्धकांमध्ये समावेश झाला आहे. तो राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचा नातू, समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती संदीप कोयटे व विश्वस्त संदीप कोयटे यांचा सुपुत्र आहे.
...........
फोटो ३०- कुलदीप कोयटे - कोपरगाव
300121\kuldip koyte , kop.jpg~300121\kuldip koyte , kop.jpg
फोटो३०- कुलदीप कोयटे - कोपरगाव ~फोटो३०- कुलदीप कोयटे - कोपरगाव