शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांचा ताळेबंद तपासूनच कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:19 IST

जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी बँकेच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी थोरात बोलत होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही सभा ऑनलाईन ...

जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी बँकेच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी थोरात बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही सभा ऑनलाईन झाली. इतर संचालक ऑनलाईन सहभागी झाले होते. बँकेच्या सभागृहात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, आमदार मोनिका राजळे, ज्येष्ठ संचालक भानुदास मुरकुटे, शिवाजी कर्डिले, गणपतराव सांगळे, करण ससाणे, अमोल राळेभात, आशा तापकीर, अमोल भांगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, बाळासाहेब साळुंके, आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, जिल्हा बँक ही जिल्ह्यातील कारखाने, दूध संघ यांच्या विकासाची मातृत्व संस्था आहे. आतापर्यंत जुन्या-जाणत्या लोकांनी बँकेला जपले आहे. आता ही बँक अजून प्रगतिपथावर नेण्याची संचालक मंडळाची जबाबदारी आहे. गावोगावच्या विकास सोसायट्या शेतकऱ्यांचा आधार आहेत. त्यामुळे बँकेच्या माध्यमातून सोसायट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करा. बँकेच्या कामकाजासाठी मनुष्यबळ कमी पडत असेल तर त्याची व्यवस्था करा. आपल्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक प्रशिक्षित करा, मात्र शेतकऱ्यांना चांगली सेवा द्या, असा सल्ला थोरात यांनी यावेळी दिला.

अध्यक्ष शेळके यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली. वेळेवर कर्ज फेडणाऱ्या संस्थांना वाढीव एक टक्का रिबेट देण्याचा बँकेचा प्रयत्न राहणार आहे. बँक लवकरच सेवा सोसायट्यांचे काम संगणकीकृत करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. करण ससाणे यांनी अहवाल वाचन केले. सबाजी गायकवाड, सचिन गुजर यांनी विविध सूचना मांडल्या.

.....................

वीज बिलासाठी बँकेने शेतकऱ्यांना कर्ज द्यावे - तनपुरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सुमारे पाच हजार कोटींची कृषिपंपांची थकबाकी आहे. सरकारने आत्ता सवलत दिली असून त्यानुसार केवळ सतराशे कोटी भरायचे आहेत. जिल्हा बँकेने जर शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज दिले तर त्यातून त्यांना कृषिपंपांचे वीज बिल भरता येईल आणि ते थकबाकीमुक्त होतील, अशी मागणी राज्यमंत्री तनपुरे यांनी केली. त्यावर ‘बँकेतील ताळेबंद पाहून विचार करू,’ असे आश्‍वासन अध्यक्ष शेळके यांनी दिले.