शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

लुटारूंच्या टोळीचा नगर परिसरात धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:53 IST

याप्रकरणी एमआयडीसी व नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शहरातील पाइपलाइन रोडवरील प्रियदर्शनी हॉटेलजवळ ८ जानेवारी रोजी रात्री गणेश ...

याप्रकरणी एमआयडीसी व नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शहरातील पाइपलाइन रोडवरील प्रियदर्शनी हॉटेलजवळ ८ जानेवारी रोजी रात्री गणेश सुजाण दास हा तरुण मित्रांसमवेत पायी जात होता. याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या पाच जणांनी कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत १७ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम व मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी गणेश दास याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर तोफखाना पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या पथकाने शोध घेतला तेव्हा पाइपलाइन रोडवर निंबळक परिसरात लुटमार करणारी टोळी एकच असल्याचे समोर आले आहे.

ट्रकचालकांसह कारचालकांना लुटले

लुटारूंच्या टोळीने रात्री पाइपलाइन रोडवर लुटमार केल्यानंतर सकाळी सात ते साडेआठ वाजेच्या सुमारास निंबळक बायपास परिसरात दोन ट्रकचालकांसह एका कारचालकाला मारहाण करून त्यांच्याकडील मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

पाच मिनिटांत लूट करून होतात पसार

नगर परिसरात फिरणारी लुटारूंची टोळी अचानक पादचारी व वाहनचालकांवर हल्ला करते. हत्यारांचा धाक तसेच मारहाण करून मिळेल तो मुद्देमाल हिसकावून पसार होतात. अवघ्या पाच मिनिटांत हे कृत्य करतात. त्यामुळे ज्यांच्यावर हल्ला झाला आहे त्यांना काही समजण्याआधीच लुटारू मोटारसायकलवरून धूमस्टाइलने पसार होत आहेत. पोलिसांनी लुटारूंचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.