तालुक्यातील जवळे कडलग येथील रहिवासी व येथील कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक, आर्थिक सल्लागार सुनील कडलग व उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांची धनश्री ही कन्या आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिउच्च दर्जा धारण केलेली व जगाला दरवर्षी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे १५ फॅशन डिझायनर देणाऱ्या शैक्षणिक संस्थेने प्रवेश देण्यासाठी सन्मानाने निमंत्रित करणे निश्चितच गौरवास्पद आहे. धनश्रीचे बुद्धिकौशल्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळे कडलगपासून विविध स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांमधून दिसले आहे. तिचे माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्वर (६वी ते ९वी) येथे तर इयत्ता दहावी ते बारावीचे शिक्षण ध्रुव अकॅडमी, संगमनेर येथे झाले.
शिक्षणतज्ज्ञ डॉ.संजय मालपाणी, चित्रकार अनुराधा ठाकूर, चित्रकार प्रा.दीपक वर्मा आणि पहल इन्स्टिट्यूटच्या निधी मिथिल, चित्रकार प्रशांत सोमवंशी यांचे मार्गदर्शन घेऊन धनश्रीने फॅशन डिझायनिंग क्षेत्र निवडून निफ्टची प्रवेश परीक्षा दिली. या प्रवेश परीक्षेतही तिने देशपातळीवर ६१वे स्थान मिळविले.