शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सावेडी उपनगरात अंत्यविधीस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:21 IST

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत अंत्‍यविधीसाठी व्‍यवस्‍थेवर ताण येत ...

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत अंत्‍यविधीसाठी व्‍यवस्‍थेवर ताण येत आहे तसेच नातेवाईकांचीही गैरसोय होत असून, सावेडी कचरा डेपो येथे अंत्यविधी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

जगताप म्हणाले, सावेडी स्‍मशानभूमी येथे कोरोना रूग्‍णांवर अंत्‍यविधीसाठीच्‍या जागेची पाहणी करून साफसफाई करण्‍यात आली आहे. याठिकाणी अंत्यविधी केले जाणार आहेत. त्यामुळे नातेवाईकांची होणारी गैरसोय टाळणे शक्य होणार आहे. विरोधी पक्षनेता संपत बारस्‍कर म्‍हणाले की, सावेडी कचरा डेपोमुळे या भागातील वि‍कासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. कचरा डेपोच्‍या दुर्गंधीमुळे नागरिकांच्‍या आरोग्‍यावरही मोठा परिणाम झाला होता. वारंवार कचरा डेपोला लागलेल्‍या आगीमुळे दुर्गंधी पसरत होती. या भागातील नागरिकांच्‍या विरोधामुळे डेपो व खत प्रकल्‍प बंद करण्यात आला आहे. त्‍यासाठी आरक्षणातील वापरायचे प्रयोजन बदलण्‍यासाठी शासनाची मंजुरी घेतली जाणार आहे. मात्र, आरक्षित जागेतील ४० टक्‍के जागेच्‍या वापराबाबत आयुक्‍तांच्‍या अधिकारात निर्णय घेतला असून, तातडीने या भागामध्‍ये कोरोना रूग्‍णांचे अंत्‍यविधी होणार आहेत. याच जागेवर आता कायमस्‍वरूपी स्‍मशानभूमी केली जाणार असल्याचे बारस्कर म्हणाले.

.....