शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

फुल खिले गुलशन.. गुलशन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 16:23 IST

नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणा-या अकोळनेर येथे रंगीबेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. येथील फुलांना दिल्ली, हैद्राबाद, बंगलोर, नागपूर, मुंबई, बडोदा यासारख्या मोठ्या मार्केटमधून मागणी असल्याने देशभर नगरी फुलांचा सुगंध दरवळणार आहे.

ठळक मुद्देझेंडू, शेवंती बरोबर अस्टर, जर्बेरा यासारख्या फुले सणासुदीसाठी सज्जअकोळनेर, कामरगाव, भोरवाडी, चास, गोरेगाव, सुपा फुलांचे आगारदिल्ली, हैद्राबाद, बंगलोर, नागपूर, मुंबई, बडोदा यासारख्या मोठ्या मार्केटमधून मागणीमारीगोल्ड, रतलाम, राजा, गोल्डन, पेपरव्हाईट, चांदणी असे शेवंतीचे प्रकार आहे.झेंडूमध्ये पिवळा, कलकत्ता, जंबो असे प्रकार आहे.

योगेश गुंडअहमदनगर : नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणा-या अकोळनेर येथे दसरा-दिवाळी या सणांना सुगंधित करण्यासाठी रंगीबेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. झेंडू, शेवंती बरोबर अस्टर, जर्बेरा यासारख्या फुले सणासुदीसाठी सज्ज झाले आहेत. समाधानकारक पावसामुळे यंदा फुलांचे उत्पादन वाढणार असून फुलांच्या बाजारभावात तेजी राहणार असल्याचे सांगण्यात येते. येथील फुलांना देशभरातील फुलांच्या बाजारातून मागणी असल्याने देशभर नगरी फुलांचा सुगंध दरवळणार आहे.काही दिवसांवर येऊन ठेपलेला नवरात्र उत्सव आणि दसरा तसेच त्यानंतर लगेच येणा-या दिवाळी या सणांना फुलांची मोठी मागणी असते. त्यात झेंडू आणि शेवंती तर चांगलीच भाव खाऊन जाते. या फुलांचे नगरमधील मुख्य आगार असणा-या अकोळनेर (ता.नगर) येथे फुलांचे मळे या सणांसाठी सज्ज झाले आहेत. अकोळनेर बरोबरच कामरगाव, भोरवाडी, चास तसेच पारनेर तालुक्यातील गोरेगाव, सुपा याठिकाणी नगर जिल्ह्यात सर्वात जास्त फुलांचे उत्पादन घेतले जाते. जिरायती जमीन आणि कमी पाण्यावर येणारी शेती म्हणून याभागात फूल शेती केली जाते. एकट्या अकोळनेर गावातच जवळपास १०० एकर क्षेत्रावर शेवंतीची लागवड करण्यात आली आहे. तर यावर्षी झेंडूचे उत्पादन काहीसे कमी झाले आहे. शेवंतीमध्ये यावर्षी मारीगोल्ड या नव्या प्रकारच्या शेवंतीची लागवड वाढली आहे. याबरोबरच रतलाम, राजा, गोल्डन, पेपरव्हाईट, चांदणी यासारखे शेवंतीचे प्रकार असून यांची लागवड करण्यात आली आहे. साधारण फेब्रुवारी महिन्यात शेवंतीची लागवड करण्यात येते. यावर्षी वेळेत पाऊस आल्याने फुलांचे उत्पादन वाढणार आहे.झेंडूमध्ये पिवळा, कलकत्ता, जंबो यासारख्या व्हरायटी आहेत. अकोळनेर येथील फुलांना दिल्ली, हैद्राबाद, बंगलोर, नागपूर, मुंबई, बडोदा यासारख्या मोठ्या मार्केटमधून मागणी होत असते, असे अरुण जाधव, रत्नाकर शिंदे, राहुल मेहेत्रे या शेतक-यांनी सांगितले.शेवंतीचा भाव चारपटीने वाढणारयंदा चांगल्या पावसामुळे झेंडू-शेवंती या फुलांचे उत्पादन वाढणार असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव चारपटीने वाढणार आहेत. शेवंतीचा भाव आज प्रती किलो २०० रुपये असला तरी सणासुदीत तो ३०० रुपयांच्या घरात जाईल असा अंदाज आहे. झेंडूच्या भावाची अशीच स्थिती राहणार आहे.शेततळ्यांचा फूल शेतीला आधारमागील काही वर्षे दुष्काळी स्थितीमुळे फुलांच्या उत्पादनात घट झाली होती. शेतक-यांनी पदरमोड करून टँकरने पाणी देऊन फुले जगवली होती.यावर्षी ५० टक्के फूल उत्पादक शेतक-यांनी शेततळे उभारल्याने फुलांच्या शेतीला मोठा आधार झाला. यामुळे फुलांना वेळेत पाणी मिळू शकले.-----सध्या पितृपक्ष असल्याने फुलांना भाव कमी झाले आहेत. मात्र दसरा व दिवाळीमध्ये फुलांचे भाव वाढतील. यंदा पावसामुळे फुलांचे उत्पादन चांगले आहे.-दशरथ गारुडकर, फूल उत्पादक-----एक एकर शेवंतीच्या लागवडीसाठी साधारण ५० हजार रुपये खर्च येतो. कधी कधी नैसर्गिक आपत्तीमुळे हा खर्चही वसूल होत नाही. यामुळे ही शेती बिनभरवशाची आहे.-बापूराव शेळके, फूल उत्पादक-------आम्ही २ एकर फुलांची लागवड केली आहे. ठिबकद्वारे पाणी दिले. यावर्षी पाऊस वेळेत झाल्याने टँकरचा खर्च वाचला आहे. यामुळे पुढील वर्षी उत्पादन आणखी वाढणार आहे.-संतोष शेळके, फूल उत्पादक