अहमदनगर : शहरात पेट्रोलचा दर १०५ रुपये तर स्वयंपाकाचा गॅसचा दर ८४८ रुपये इतका झाला आहे. या आठवड्यात पेट्रोलमध्ये पाच रुपयांची तर घरगुती वापराच्या गॉसची किंमत २५ रुपयांची वाढली आहे. आधीच कोरोनाच्या निर्बंधाने त्रस्त झालेल्या नागरिकांना इंधन दरवाढीच्या भडक्याची झळ बसणार आहे.
गत महिन्यात पेट्रोलने शंभरी पार केली होती. महिनाभरात पेट्रोलचे दर २५ ते ५० पैशांनी वाढत ते आता १०५ रुपये प्रतिलीटर इतके झाले आहेत. पेट्रोलची दरवाढ सुरू असतानाच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. गुरुवारी गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महाग झाले. हा दर आधी ८२२.५० रुपये इतके होते, त्यात २५.५० रुपयांनी वाढ झाल्याने तो दर आता ८४८ रुपये इतका झाला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आता या महागाईची झळ बसणार आहे.
-------------
पेट्रोल-़डिझेलच्या किमती आता आंतरराष्ट्रीय बाजारात काय दर आहेत, त्यावरून ठरतात. हे दर रोज वाढत आहेत. गत महिन्यापासून रोज २८ पैशांनी पेट्रोल वाढत आहे. त्यामुळे ते १०५ रुपयापर्यंत कधी गेले, याकडे ग्राहकांचेही फारसे लक्ष नसते. जोपर्यंत पेट्रोलवरील देशांतर्गत कर कमी होत नाहीत, तोपर्यंत पेट्रोलचे दर कमी होणे शक्य नाही.
-चारुदत्त पवार, पेट्रोल पंप चालक असोसिएशन
-------------
पेट्रोल शंभरीपार गेले आता डिझेलही शंभरीकडे जाईल. गॉस सिलिंडरचे दर शुक्रवारी वाढले. एकीकडे कोरोना निर्बंधामुळे उद्योगधंदे अजूनही सुरळीत झालेले नाहीत. दुसरीकडे भाजीपाला, किराणा मालाचे, इंधनाची दरवाढ झाल्याने आता सामान्य माणसाचे जगणेच महाग झाले आहे.
-महेश मोरे, केडगाव
----------
असे आहेत दर
पेट्रोल-१०५.५० रुपये ली.
डिझेल-९५.५० रुपये ली.
गॅस सिलिंडर-८४८ रुपये
--
फाईल फोटो- गॅस सिलिंडर