शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा

By admin | Updated: March 18, 2024 18:04 IST

पाथर्डी : महिला रुग्णाच्या मृत्युला वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करुन तालुक्यातील आगसखांड येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा नेऊन वैद्यकीय अधीक्षकांना धारेवर धरले.

पाथर्डी : महिला रुग्णाच्या मृत्युला वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करुन तालुक्यातील आगसखांड येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा नेऊन वैद्यकीय अधीक्षकांना धारेवर धरले. या घटनेची सखोल चौकशी करुन संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थांनी यावेळी केली. मोर्चा पोलिसांनी अडविलापाथर्डी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सकाळी उपजिल्हा रूग्णालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चात माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. दिनकर पालवे, साहेबराव रंधवे, सर्जेराव रंधवे, अफ्रुकाबाई रंधवे यांच्यासह मयताचे नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणा देत मोर्चा उपजिल्हा रूग्णालयावर गेल्यानंतर तो पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनी रूग्णालयाच्या प्रवेशव्दारावरच अडविला. नातेवाईकांचा आरोपरूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे शोभा रंधवे या महिलेचा मृत्यू झालेला आहे, रूग्णांकडे लक्ष देण्यात आलेले नाही तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन औषधे आणण्याची सक्ती केली जाते, असा आरोप मयत शोभा हिचे नातेवाईक व ग्रामस्थांनी केला. गावात तापाची साथआगसखांड गावात सध्या तापेची साथ असून गावातील सुमारे ५० रूग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत असे मोर्चेकऱ्यांनी निदर्शनास आणून देत पाण्याचे नमुने तपासण्याची मागणी केली. डॉ.मनिषा खेडकर यांनी मोर्चेक-यांना शांत केले. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. (तालुका प्रतिनिधी)आरोपात तथ्य नाहीमयत शोभा रंधवे हिच्या मेंदूमध्ये ताप गेल्यामुळे ती बेशुध्द झाली. तिच्या अंगात अनेक दिवस ताप मुरला. मी स्वत: रुग्णाला रूग्णवाहिकेतून नगरला घेऊन गेलो. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला या ग्रामस्थांच्या आरोपात अजिबात तथ्य नाही. रूग्णालयाची यामध्ये कोणतीही चूक नाही.- डॉ. पी. आर. शिरसाट वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयात दाखल करण्यास विलंबमयत शोभा रंधवे काही दिवसांपासून तापाने आजारी होती. प्राथमिक उपचारानंतर तिला नऊ सप्टेंबर रोजी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन तिला नगरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. व त्याच दिवशी तिला नगरला हलविण्यात आले. परंतु उपचार सुरु असतानाच दुसऱ्या दिवशी दहा सप्टेंबर रोजी तिचे निधन झाले. मयत शोभाला रुग्णालयात उशिराने दाखल करण्यात आल्याने उपचाराची संधी मिळाली नाही, असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी.आर. शिरसाट यांचे म्हणणे आहे.