शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चा आला अंगलट

By admin | Updated: August 13, 2015 23:10 IST

श्रीरामपूर : शिक्षक नेमण्याच्या मागणीसाठी गुरूवारी श्रीरामपूर नगरपालिकेच्या एका शाळेतील शिक्षिकांनी नगरपालिकेत मोर्चा नेला.

श्रीरामपूर : शिक्षक नेमण्याच्या मागणीसाठी गुरूवारी श्रीरामपूर नगरपालिकेच्या एका शाळेतील शिक्षिकांनी नगरपालिकेत मोर्चा नेला. पण कायद्याच्या कचाट्यात अडकलेला हा मोर्चा या शिक्षिकांच्या चांगलाच अंगलट आला.या शाळेतील एका पुरूष शिक्षकाची बदली झाली आहे. त्यामुळे या शाळेत सध्या चार शिक्षिकाच आहेत. शाळेच्या परिसरातील गोंड, शिकलकरी समाजातील मुलांच्या दररोज घरी जाऊन दादा, बाबा करीत हात जोडून त्यांना शाळेत आणावे लागते. पूर्वीचे पुरूष शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अशाप्रकारे विद्यार्थ्यांना आणीत होते. पण आता या शाळेत एकही पुरुष शिक्षक नसल्याने या महिलांची गेल्या काही महिन्यांपासून अडचण होत आहे. त्यातच या शाळेत सातवीपर्यंतचे विद्यार्थी असल्याने मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी शिक्षिकांना अडचणी येतात़ याच मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी काही दिवसांपासून बदलून गेलेल्या आमच्या शिक्षकांना पुन्हा शाळेत नेमावे, असा आग्रह धरला़ त्यामुळे हा मोर्चा काढल्याचे शिक्षिकांनी सांगितले़शाळेच्या वेळेत अध्यापनाचे काम सोडून विद्यार्थ्यांचा मोर्चा आणला, अध्यापन व शाळा बंद ठेवली या कारणावरून मोर्चा आणणाऱ्या शिक्षिकांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचा आदेश शिक्षण मंडळाचे प्रमुख व पालिका मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला.