नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन तसेच बोटा ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन सरपंच सोनाली शेळके, कांताबाई वाघमारे यांच्या हस्ते झाले. या शिबिरात विविध ठिकाणच्या एकूण ७९ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८ रुग्णांना तपासणी दरम्यान मोतीबिंदू आढळल्याने त्यांच्यावर मंगळवारी (ता. २८) नारायणगाव येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरात डॉ. मोहन ठुसे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, उपसरपंच पांडू शेळके, युवक काँग्रेसचे बाळासाहेब कुऱ्हाडे, विकास शेळके, तेजश्री माळी, विजय पानसरे, दिनेश पावडे, संभाजी काळे, प्रमोद कुरकुटे, निखिल कुरकुटे, मिथुन खोंडे आदी उपस्थित होते.
मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST