अहमदनगर : जागतिक कर्करोग दिनानिमित्त गुरुवारी येथील डॉ. गरुड हॉस्पिटल व अहमदनगर कॅन्सर सेंटर येथे मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे, डॉ. मयूर मुथा, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष क्षितिज झावरे, सेक्रेटरी दिगंबर रोकडे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. प्रकाश गरूड, लेडीज कॅन्सरतज्ज्ञ डॉ. पद्मजा गरुड, रेडिओ थेरपीतज्ज्ञ डॉ. जगदीश शेजूळ, अमेरिकन व्हेरियन रेडिओ थेरपी मशपन कंपनीचे अधिकारी राहुल उंबरकर, हॉस्पिटलचे सीईओ. ॲड. अभय राजे, डॉ. अजिता गरुड-शिंदे, डॉ. योगेश गरूड, ज्येष्ठ महिला रुग्ण पुष्षा डागा आदी उपस्थित होते. डागा यांनी २० वर्षांपासून गरुड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत कॅन्सरवर यशस्वी मात केली आहे. त्यांचा डाॅ. पोखर्णा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शहरातील नगर-मनमाड रोडवरील डॉ. गरुड कॅन्सर हॉस्पिटल ३५ वर्षांपासून कॅन्सरग्रस्तांवर यशस्वी उपचार करीत आहे. येथे सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया, कॅन्सर केमोथेरपी, रेडियोथेरपी, मॅमोग्राफी तपासणी उपलब्ध आहेत. केंद्र शासनाची प्रधानमंत्री जीवन आरोग्य विमा योजनेंर्तगत रेडिओ थेरपीसह कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार मोफत उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रेडिओथेरपी लाईटसह कॅन्सर शस्त्रक्रिया, केमोथेरपी हे सर्व उपचार मोफत केले जातात. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मनोगतात गरुड हॉस्पिटलमधील कॅन्सरवरील आधुनिक उपचार सुविधांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन ॲड. अभय राजे यांनी केले. दिगंबर रोकडे यांनी आभार मानले. या शिबिराचा जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील अनेक रुग्णांनी लाभ घेतला. (वा. प्र. )
--------------
फोटो- ०४ गरुड हॉस्पिटल
नगर-मनमाड रोडवरील गरुड हॉस्पिटलमध्ये कँन्सर दिनानिमित्त बुधवारी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, डॉ. प्रकाश पोखरणा यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर.