शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

धारदार शस्त्रांसह चौघांना अटक

By admin | Updated: September 2, 2014 23:31 IST

अहमदनगर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघा जणांच्या टोळीला पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांच्या विशेष पथकाने मंगळवारी पहाटे अटक केली.

अहमदनगर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघा जणांच्या टोळीला पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांच्या विशेष पथकाने मंगळवारी पहाटे अटक केली. अंधाराचा फायदा घेऊन दोघे जण पळाले असून त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. चौघांकडे धारधार हत्यारे सापडल्याने ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक लखमी गौतम, उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांच्या आदेशाने शहरात सध्या पोलिसांची रात्रं-दिवस गस्त सुरू आहे. तोफखाना पोलिसांची गस्त सुरू असताना ही टोळी आढळून आली. मंगळवारी पहाटे साडेचार वाजता सावेडी नाका येथील जुन्या सावेडी बसस्थानकाजवळील शौचालयाच्या आडोशाला काही इसम बसल्याचे पोलिसांना दिसले. याचा पोलिसांना संशय आला. यावेळी तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मण काळे व त्यांचे सहकारी यांनी थोड्या अंतरावर जावून सरकारी वाहन उभे केले आणि रस्त्याने पायी येत असताना ते आपापसात काहीतरी कुजबुज करीत असल्याचे लक्षात आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर अचानक झडप घातली. यावेळी चारजण जागेवरच पकडले. अंधाराचा फायदा घेऊन दोघेजण सीना नदीच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्या दोघांचा पोलिसांनी शोध घेतला, मात्र ते फरार झाले.चार जणांना पकडले त्यांची नावे अशी आहेत. श्रावण महादू माळी (वय २६, रा. तीनकुनिया, ता. जि. अलाहाबाद), राजेश संतोष फुलमाळी (वय २८, रा. सुकी, भोपाळ), ओमप्रकाश रबी काळे (वय १८, रा. धनगरवस्ती, लिंपनगाव, ता. श्रीगोंदा), अजय राजू ठाकूर (वय १७,रा. सुकी समरिया, भोपाळ). या चौघांनी पळून गेलेल्या दोघांची नावे लखन शंकर काळे (रा. तीनकुनिया, जि. अलाहाबाद, हल्ली रा. जामखेड) आणि राजू उर्फ रम्या गौड (रा. पाखरी, जामखेड)अशी आहेत, असे सांगितले. वाय.डी. पाटील यांच्या पथकामध्ये निरीक्षक लक्ष्मण काळे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक एम.एम. काकडे, पोलीस उपनिरीक्षक एम.बी. भोसले, पोलीस नाईक संदीप पवार, विश्वास गाजरे, दत्तात्रय हिंगडे, शरद गायकवाड, दथरथ थोरात, होमगार्ड साईनाथ साळुंखे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)चौघांची पोलिसांनी अंगझडती घेतली असता चौघांकडे वेगवेगळी शस्त्रे सापडली. एकाकडे जांबिया (चाकू), दुसऱ्याकडे स्टीलचे फायटर लॅस्टिक आणि लाल रंगाची मिरची पूड, तिसऱ्याकडे एक गिलवर, चौथ्याकडे लोखंडी कटावणी अशी हत्यारे आढळून आली. त्यांच्याकडे शस्त्रे असल्याने ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम.एम. काकडे तपास करीत आहेत.