अहमदनगर : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील घाटात धबधबा पाहण्यासाठी गेलेले चार युवक सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दरीत कोसळले़ रात्री साडेनऊ वाजता त्यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले़वांबोरी - नगर मार्गावरील घाटात उंचीवरुन धबधबा कोसळतो़ हा धबधबा पाहण्यासाठी शुभम अशोक मोरे (केडगाव), गणेश पोपट वायाळ (माळीवाडी), श्रीराम प्रभाकर रेड्डी (केडगाव), युवराज साळुंके (केडगाव), प्रतिक राजेंद्र गायकवाड (सावेडी) असे अहमदनगर मधील पाच युवक सोमवारी दुपारी गेले होते़ यातील चार युवक पाय घसरुन खोल दरीत पडले़ त्यातील गायकवाड हा बचावला आहे़प्रशासनाला याची माहिती मिळताच नगरहून अग्नीशमन दलाचे कर्मचारी, नगर एमआयडीसी पोलीस ठाणे व वांबोरी पोलीस चौकीचे कर्मचारी, तहसीलदार अनिल दौंडे घटनास्थळी दाखल झाले़ रात्री साडेनऊ वाजता मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले़
धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा दरीत कोसळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 21:42 IST