अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे चौघे रुग्ण काही दिवसांपूर्वी लोणी प्रवरा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून ते चोघेही कोरोनाबाधित आहेत, असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता ३७ वर पोहोचली आहे. या चौघांना सर्दी, खोकल्याचा त्रास असल्याने एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यात ते पॉझिटिव्ह निघाले. दरम्यान, बुधवारी (दि.२२) रात्री जामखेड येथील दोघांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे अहमदनगरचा आकडा आता ३७ वर पोहोचला आहे. आतापर्यंत वीस जणांना डिस्चार्ज दिलेला असून दोघांचा मृत्यू झाला आहे. आता जामखेड येथील दोघे व संगमनेर येथील चौघा पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपकार्तील लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
संगमनेरमध्ये पुन्हा चौघांना कोरोनाची लागण; नगर जिल्ह्याचा आकडा पोहोचला ३७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 14:27 IST