कोपरगाव : जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील संवत्सर येथील मनाई वस्तीच्या जिल्हा परिषद शाळेतील चाळीस मुलींचे सोमवारी ( दि. ८) सुकन्या समृद्धी योजनेचे पोस्टात खाते उघडून त्यांचा सन्मान करण्यात आला. हा उपक्रम सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक मुलीचे २५० रुपयांप्रमाणे पैसे भरून पोस्टात खाते उघडण्यात आले. मुलींच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी ही योजना फार महत्त्वाची आहे. प्रत्येक पालकांपर्यंत ही योजना पोहोचवू, असा आशावाद मालकर त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवत्सर गावच्या महिला सरपंच सुलोचना ढेपले होत्या.
यावेळी पोस्टमास्तर राजेश नेतनकर, नंदकिशोर लांडगे यांनी सुकन्या समृद्धी योजनाचे महत्त्व पालकांना सांगितले. यावेळी उपसरपंच विवेक परजने, केंद्रप्रमुख राजेंद्र ढेपले, दिलीप ढेपले, संस्थेच्या सदस्य सुनीता ससाने, सर्व शिक्षक उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने यांनीदेखील शाळेत राबविलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
फोटो०९ -संगीता मालकर