शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

बालमावळ््यांनी बनविले किल्ले!

By admin | Updated: October 27, 2016 00:47 IST

अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच व साईदिप ग्रुप आयोजित किल्ले बनवा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. हॉटेल यश पॅलेस व यश ग्रँड हे या स्पर्धेचे सहप्रायोजक होते.

अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच व साईदिप ग्रुप आयोजित किल्ले बनवा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. हॉटेल यश पॅलेस व यश ग्रँड हे या स्पर्धेचे सहप्रायोजक होते.शहरातील भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी सकाळी ही स्पर्धा झाली. स्पर्धेत एकूण ८० पेक्षा जास्त संघ सहभागी झाले होते.प्रत्येक संघात ६ पेक्षा जास्त विद्यार्थी होते. दिवाळीचा जल्लोष आणि किल्ले बनवा स्पर्धेमुळे सहभागी विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित झाला होता. विद्यार्थ्यांना किल्ले बनविण्यासाठी माती, विटा, पाणी आयोजकांच्या वतीने देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी डोंगराचा माथा, त्यावर किल्ला, मावळे, खोल-खोल दऱ्या, झाडे, प्राणी, पक्षी किल्ल्याच्या आसपासच्या प्रदेश तेथील वस्ती, शेती, तलाव इ. गोष्टी हुबेहूब साकारून आपआपले किल्ले बनविले. आपलाच किल्ला कसा आकर्षक दिसेल त्यासाठी धावपळ, एकमेकांना सूचना अशा उत्साही वातावरणात ही स्पर्धा झाली.स्पर्धेचे परीक्षण भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाचे सतीश गुगळे, प्रियदर्शनी पब्लिक स्कूलचे नितीन कांगोरे यांनी केले. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक दुगड सर व उपमुख्याध्यापक औटी सर तसेच हॉटेल यश पॅलेस व यश ग्रँडचे योगीराज गाडे यांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख बक्षिसे, आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आली. तसेच प्रत्येक सहभागी संघांना देखील प्रमाणपत्रे देण्यात आली. उपस्थित पालकांनी देखील लोकमतच्या या उपक्रमाची स्तुती केली.(प्रतिनिधी)