लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : आज ग्रामीण भागातील तरुण सैराट झालेला आहे. परंतु त्याने ग्रामीण विकासासाठी सैराट होण्याची आवश्यकता आहे. रोजगार हमीच्या श्रमाला प्रतिष्ठा नसल्यामुळे कोणीही हे काम करीत नाही. तत्वासाठी संघर्ष करणे महत्वाचे आहे. म्हणूनच ग्रामीण विकास प्रक्रियेसाठी परदेशी तंत्रज्ञानासोबत भारतीय अध्यात्माची जोड आवश्यक आहे, असे आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितले़स्नेहालय संस्थेतील ‘सेवांकुर २०१७’ या युवा प्रेरणा शिबिरातील दुसºया सत्रातील मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. प्रयास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश सावजी यांनी हा संवाद साधला. पवार म्हणाले, थोर महात्म्यांची पुस्तके वाचूनच माझ्या मनातील नैराश्य दूर करता आले. जीवनामध्ये आनंद व समाधान नसेल तर शाश्वत आनंद मिळत नाही. संघर्ष केल्याशिवाय आपण आपली उद्दिष्ट गाठू शकत नाही. ग्रामीण विकासासाठी निवडणूक आणि विकास प्रक्रियेचा समन्वय साधने महत्वाचे आहे. श्रीमंतीचा हव्यास थांबविल्याशिवाय विकास प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय विचार एकत्र आल्याशिवाय विकास कामे पूर्ण होऊ शकत नाहीत, असे परखड मत त्यांनी यावेळी मांडले.ग्रामीण विकास आणि आदर्श ग्राम याबाबत शिबिरार्थींच्या अनेक प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.
परदेशी तंत्रज्ञानाला अध्यात्माची जोड हवी - पोपटराव पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 16:30 IST