शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

फुलांचे मळे बहरले

By admin | Updated: September 28, 2016 00:37 IST

योगेश गुंड , अहमदनगर दसरा-दिवाळी या सणासुदीच्या दिवसात झेंडू,शेवंती यासारख्या फुलांना मोठी मागणी असते. सध्या या फुलांच्या लागवडीचे मुख्य आगार असणाऱ्या अकोळनेर (ता.नगर)

योगेश गुंड , अहमदनगरदसरा-दिवाळी या सणासुदीच्या दिवसात झेंडू,शेवंती यासारख्या फुलांना मोठी मागणी असते. सध्या या फुलांच्या लागवडीचे मुख्य आगार असणाऱ्या अकोळनेर (ता.नगर) मध्ये झेंडू व शेवंतीचे मळे बहरले आहेत. एकट्या अकोळनेर गावात दुष्काळजन्य परिस्थिती असूनही शेतकऱ्यांनी टँंकरने विकतचे पाणी देऊन फूल शेतीची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा टिकवली आहे. सध्या फुलांना समाधानकारक भाव नसला तरी सणासुदीत तो वाढेल अशी फूल उत्पादक शेतकऱ्यांना आशा आहे.सणासुदीचे दिवस म्हटले की, आनंद हा जसा दरवळत असतो तसा त्या आनंदात भर घालण्यासाठी फुलांचा सुगंधही दरवळत असतो. मात्र गेल्या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने फूलशेती अडचणीत आली. यावेळी मात्र नगर तालुक्यात पावसाचे प्रमाण बरे असल्याने फूलशेतीची लागवड एकट्या अकोळनेर गावातच ५०० एकर क्षेत्रात झाली आहे. शेजारील सारोळा कासार, भोरवाडी, कामरगाव, सुपा या भागातही फूलशेतीला प्राधान्य दिले जाते. मात्र सर्वात जास्त उत्पादन व लागवड अकोळनेर गावातच होते. शेवंतीची लागवड मार्च-एप्रिल महिन्यात झाल्याने तेव्हा दुष्काळजन्य स्थिती होती. तरीही फूल उत्पादक शेतकऱ्यांंनी फूलशेतीची परंपरा टिकवण्यासाठी पदरमोड करून विकतचे पाणी देवून शेवंती जागवली आहे. अकोळनेरमध्ये रतलाम, राजा, बंगलोर, पिवळी, बिजली अशा खूप जाती आहेत. या सर्व जातीची लागवड अकोळनेरमध्ये झालेली आहे. तसेच झेंडूची लागवड पावसाळ्यात झाली असून त्यात इंडिका, तुळजापुरी, छोटा, पिवळा-लाल झेंडूची लागवड करण्यात आली आहे. याबरोबरच अस्टर, गलांडा, गुलाब, जरबेरा यासारख्या रंगीबेरंगी फुलांचे उत्पादन अकोळनेरमध्ये घेतले जाते.