शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करुन केला पाच वर्षाच्या बालकाचा खून; भिंगाण शिवारात सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 14:33 IST

१३ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या भिंगाण येथील वैभव बापू पारखे (वय ५) या चिमुरड्याचा मृतदेह सोमवारी सकाळी भिंगाण शिवारात काटेरी झुडपात सापडला. संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

श्रीगोंदा : १३ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या भिंगाण येथील वैभव बापू पारखे (वय ५) या चिमुरड्याचा मृतदेह सोमवारी सकाळी भिंगाण शिवारात काटेरी झुडपात सापडला. संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.वैभव पारखे याचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या स्थितीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव हे सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचले.वैभव हा गायब झाल्यानंतर वैभवचे वडील बापू पारखे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबविली़ पण यश आले नव्हते. वैभवचे अपहरण संपत्तीच्या वादातून की नरबळीसाठी झाले, याबाबत पोलिसांचा शोध सुरु होता. पोलिसांना वैभवचा किंवा आरोपींचा शोध घेण्यात यश आले नव्हते. अखेरीस बापू पारखे यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या काटेरी झुडपात वैभवची पॅन्ट व डोक्याची कवटी गुराख्यांनी पाहिली आणि पोलीसांना खबर दिली. वैभवचा खून करून खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एखाद्या खड्यात पुरला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वैभव पारखे या चिमुरड्याचा खून झाला हे प्रकरण अतिशय नाजूक आहे़ त्यामुळे वैभवची आम्ही डीएनए चाचणी करणार आहे़ खुन कशा पद्धतीने करण्यात आला याचा छडा वैद्यकिय अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल़ आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल़-बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस