अहमदनगर : अकरावी प्रवेशासाठी आज कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये फलकांवर लावलेली खुल्या वर्गाची पहिली गुणवत्तायादी नव्वदीपार गेली. विज्ञान आणि वाणिज्य शाखांमध्येच प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ लागली आहे. कला शाखेसाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालयात आपल्या कलाने प्रवेश घेता येईल.अकरावीत प्रवेशासाठी जिल्हा परिषदेने कनिष्ठ महाविद्यालयांना वेळापत्रक आखून दिले आहे. त्याप्रमाणे प्रवेशअर्ज व गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेली गुणवत्तायादी पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांची महाविद्यालयात झुंबड उडाली होती.शहरातील मोजक्याच कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले आहेत. न्यू आर्टस् महाविद्यालयात विज्ञान शाखेची खुल्या वर्गातील गुणवत्तायादी ९२.८० टक्के व सारडा महाविद्यालयाची ९३.४० टक्क्यांवर बंद झाली. वाणिज्य शाखेसाठी अनुक्रमे ७५ व ८१.६० टक्क््यांपर्यंत खाली उतरली.शहरातील नामवंत महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. त्यानंतर वाणिज्य शाखेला पसंती आहे.सर्वच महाविद्यालयात कला शाखेसाठी प्रवेश खुला आहे. तरीही जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे.अहमदनगर महाविद्यालयात ३ हजार ६९२, पेमराज सारडामध्ये २ हजार ८०७, न्यू आर्टस्मध्ये ४ हजार ४९५, तर रेसिडेन्शिअलमध्ये ३ हजार ६९२ प्रवेशअर्ज आले असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. नगर महाविद्यालयात उपप्राचार्य प्रा. गायकवाड, न्यू आर्टस्मध्ये उपप्राचार्य रिंगे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. सारडा महाविद्यालयाची माहिती रजिस्ट्रार अशोक असेरी यांनी दिली.नगर महाविद्यालयात विज्ञानची खुल्या वर्गाची यादी ८५, वाणिज्यची ७५ टक्क्यांवर आली. (प्रतिनिधी)विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. या शाखेतून पदवी घेतल्यानंतर नोकरी व व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळेच तिकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. कला शाखेचे प्रवेश खुले ठेवूनही महाविद्यालयांत प्रवेश पूर्ण होत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून ही स्थिती आहे.-एन. एस. गायकवाड,उपप्राचार्य, नगर महाविद्यालय,पहिल्या गुणवत्तायादीप्रमाणे विद्यार्थ्यांना दि. ३ ते ५ जुलैपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश घेता येईल. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशावर हक्क सांगता येणार नाही. दोन दिवसांनंतर प्रतीक्षा यादी लागणार आहे. बहुतांशी विद्यार्थ्यांनी दोन महाविद्यालयांत अर्ज भरले आहेत. एकीकडे नंबर लागल्यास ते विद्यार्थी दुसरीकडे जाणार नाहीत. त्या ठिकाणी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते.
पहिली गुणवत्तायादी नव्वदीपार!
By admin | Updated: July 3, 2014 00:58 IST