सीसीटीएनएस प्रणालीमध्ये १ ते २१ फॉर्मची विभागणी केलेली असून, यामध्ये होणाऱ्या कामकाजाच्या अनुषंगाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) गुणांकन दिले जाते. महाराष्ट्रातील ४८ युनिटमधून गुणांकानुसार २११ गुणांपैकी नगरने १९७ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. या प्रणालीत नगरचा एप्रिल महिन्यात तिसरा क्रमांक आला होता. यामध्ये आणखी उत्कृष्ट कामकाज झाल्याने राज्यात प्रथम येण्याचा मान नगरला मिळाला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस विभागातील सहायक फौजदार आर. डी. बारवकर, एस. एस. जोशी, पोलीस नाईक ए. के. गोलवड, आर. व्ही. जाधव, एस. एस. काळे, के. पी. ठुबे, एस. ए. भागवत, टी. एल. दराडे, अभियंता अंबादास शिंगे या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सोमवारी पोलीस अधीक्षक पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
------------------------
पोलीस दलासाठी उपयुक्त प्रणाली
सीसीटीएनएस या सर्च प्रणालीमध्ये देशपातळीवरील गुन्हे आणि गुन्हेगारांची माहिती उपलब्ध होते. त्यानुसार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, पासपोर्ट चारित्र्य पडताळणी, वाहनांची पडताळणी करण्यासाठी या कार्यप्रणालीचा उपयोग होत असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
-----------------
आयटीएसएसओ प्रणालीमध्येही चांगली कामगिरी
महिला, बालकांविरोधात दाखल अत्याचाराच्या गुन्ह्यांचा वेळेत तपास पूर्ण करून त्याची सीसीटीएनएस प्रणालीमध्ये नोंद होण्यासाठी गृह मंत्रालयाने २०१८ पासून आयटीएसएसओ पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यामध्ये तुलनात्मक दर दर्शविण्यात येतो. त्याचे अनुपालन करून महिला, बालकांविरोधात दाखल अत्याचाराच्या गुन्ह्यांचे वेळेत प्रणाली अंतर्गत दाखल करून जिल्ह्याचा पूर्णत्वाचा दर वाढत असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
फोटो- १२ पोलीस १
ओळी : सीसीटीएनएस प्रणातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. समवेत अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निरीक्षक अनिल कटके.