अहमदनगर : राज्यसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत सावेडी उपनगरातील अतुल अनिल कानडे हे राज्यात प्रथम आले असून, द्वितीय क्रमांक शेवगाव तालुक्यातील एरंडगाव येथील राहुल रावसाहेब धस यांनी पटकाविला आहे़ त्याचबरोबर पारनेरच्या प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार प्रियंका आंबेकर महिलांध्ये राज्यात प्रथम आल्या आहेत़ त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे़ राज्यसेवा आयोगाच्या वतीने २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला़ नगर शहरातील रासनेनगर येथील रहिवाशी अतुल कानडे राज्यात प्रथम आले आहेत़ त्यांची राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी निवड झाली आहे़ पुणे येथे कानडे यांनी अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली आहे़ राज्यात द्वितीय क्रमांकाने शेवगाव तालुक्यातील राहुल धस हे उत्तीर्ण झाले असून, त्यांची पोलीस उपधीक्षकपदी निवड झाली आहे़ महिलांमध्ये पारनेर तहसीलदार कार्यालयात प्रशिक्षणार्थी निवासी नायब तहसीलदार प्रियंका आंबेकर या राज्यात प्रथम आल्या आहेत़ त्या पुणे जिल्ह्यातील आहेत़ त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली असून, त्या यापूर्वी बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत होत्या़ त्यांचा पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे यांनी सत्कार केला़ (प्रतिनिधी)
राज्यसेवा परीक्षेत नगरचा कानडे प्रथम
By admin | Updated: April 7, 2016 00:03 IST