शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

विधानसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: July 25, 2014 00:25 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्र लवकरच दाखल होतील़ मतदार नोंदणीसाठीचे अभियान गतिमान करण्यात येत असून, शाळा व महाविद्यालयांना नाव नोंदणीच्या सूचना देण्यात आहेत

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्र लवकरच दाखल होतील़ मतदार नोंदणीसाठीचे अभियान गतिमान करण्यात येत असून, शाळा व महाविद्यालयांना नाव नोंदणीच्या सूचना देण्यात आहेत, असे सांगून निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गुरुवारी दिली़विधानसभा निवडणुकीविषयी माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कवडे बोलत होते़ कवडे म्हणाले, मतदारांची पुरवणी यादी येत्या ३१ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे़ ही मतदार यादी नोंदणीकृत आठ राजकीय पक्षांना पुरविण्यात येणार आहे़ विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र येत्या १ आॅगस्ट रोजी दाखल होणार आहेत़ मतदान यंत्र बंद पडणे, तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना घडत असल्याने निवडणुकीसाठी सन २००६ नंतरची ५ हजार ४०० मतदान यंत्र इतर राज्यांतून उपलब्ध होणार आहे़ ही यंत्र अमेठी, बागपत फिरोजाबाद आणि रायबरेली येथून आणली जातील, असे ते म्हणाले़ मतदार नोंदणीसाठीचे अभियान राबविण्यात येत आहे. महिलांची नाव नोंदणी समाधानकारक नाही़ त्यामुळे महिला मतदारांची नोंदणी करण्यावर शेवटच्या टप्प्यात भर देण्यात येणार आहे़ सन २०११ मध्ये झालेल्या जणगणनेनुसार ही निवडणूक होत असून, आतापर्यंत ३२ लाख ३ हजार ४५१ मतदारांची नोंदणी झाली आहे़ तुलनेत महिलांची मतदार नोंदणी कमी आहे़ एक हजार पुरुषांमागे ३८ महिला मतदार नोंदणी, असे प्रमाण आहे़ महिला मतदार नोंदणी वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे़ लोकसभा निवडणुकीत महिलांच्या मतदानाचे प्रमाण कमी आहे़ ते वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील़ त्यासाठी सहकारी संस्था, सोसायटी, शाळा, महाविद्यालये, खासगी संस्था, पतसंस्थांच्या प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या आहेत़ पुढील काळात हे प्रमाण वाढवून महिलांचे मतदान वाढेल,अशी अपेक्षा आहे़ (प्रतिनिधी)घरपोहोच स्लीपजिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील मतदारांची माहिती घेण्यात आली आहे़ मतदारांना यावेळी घरपोहोच स्लीप मिळणार आहे़प्रत्येकाला स्लीप मिळेल,याची व्यवस्था निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे़ कर्मचाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात येणार असून, मतदारांनी याबाबत निश्चिंत राहावे,असे आवाहन कवडे यांनी केले आहे़मतदार नोंदणीएकूण मतदार- ३२, ०३,४५१पुरुष मतदार-१६, ८४, २१८महिला मतदार- १५, १८, १२९