जन आधार संघटनेच्या माध्यमातून आरोग्य विभागातील महिला परिचर महासंघ स्थापन करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महिला परिचर यांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १ एप्रिलपासून सुरवात केली आहे. या महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जनधार संघटना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. येत्या काही दिवसांत या महिलांच्या समस्या सोडविण्याबाबत पाठपुरावा केला जाईल. एवढे करूनही अधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घातले नाही तर जिल्हा परिषदेसमोर पहिला परिचय यांना सोबत घेऊन आंदोलन छेडू, असा इशारा प्रकाश पोटे यांनी दिला. यावेळी संघटनेचे दिपक गुगळे, अमित गांधी, काळे, महिला परिचर कल्पना महाडिक, प्रतिभा सोनवणे, सुरेखा जाधव, उषा केदार आदी उपस्थित होते.
-------
फोटो मेल वर
०१ जनाधार
जन आधार संघटनेच्या माध्यमातून आरोग्य विभागातील महिला परिचर महासंघ स्थापन करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्यासह महिला परिचर उपस्थित होत्या.