अहमदनगर : डॉ़ नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होवून एक वर्षे उलटले तरी अद्यापपर्यंत मारेकरी व सूत्रधारांचा शोध लागलेला नाही़ त्यातच पुणे पोलिसांकडून तपासासाठी प्लँचेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे़ डॉ़ दाभोळकरांच्या हत्येचा तपास त्वरित लावावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारने सीबीआयला सहकार्य करून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी अंधश्रद्ध निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे़ डॉ़ दाभोलकरांच्या हत्येच्या तपासात विलंब झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि़२०) ‘अनिस’चे कार्यकर्त्यांनी निदर्शने केली़ यावेळी अॅड. रंजना गवांदे, शिवाजी नाईकवाडे, दत्ता दिकोंडा, अॅड. प्रकाश येरूड, काशिनाथ गुंजाळ, आनंद किल्लोर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
अंनिसची तीव्र निदर्शने
By admin | Updated: August 20, 2014 23:27 IST