पिंपळगाव माळवी : महावितरणने शेतकरी बांधवांसाठी आणलेल्या नवीन कृषी योजना २०२० चा लाभ घेण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर यांनी पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे शेतकरी मेळाव्यात केले. कोपनर म्हणाले, या योजनेंतर्गत थकीत बिलाचे पन्नास टक्केच रक्कम भरावयाची आहे. उच्चदाब, लघुदाब, कृषी ग्राहक व उपसा जलसिंचन योजनेतील चालू व खंडित वीजपुरवठा असलेले ग्राहक या योजनेस पात्र आहेत. शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेऊन थकीत वीजबिल भरणे गरजेचे आहे. अन्यथा, त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. गावात जमा होणारी थकबाकी रकमेचा ३३ टक्के रक्कम गावातील वीज वितरणच्या कामासाठीच खर्च करण्यात येणार आहे. यावेळी महावितरणचे उपअभियंता ललित नारखेडे, मुख्य तंत्रज्ञ अर्जुन गायकवाड, लाइनमन वसंत शिंदे, निती उपळकर, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब झिने, मेजर विश्वनाथ गुंड व शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी महावितरण कृषी योजनेचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:20 IST