शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कारखान्यांचे बॉयलर थंडावले

By admin | Updated: April 18, 2016 00:38 IST

अहमदनगर : मराठवाड्याला सोडण्यात आलेले पाणी, उसाचे घटलेले क्षेत्र यामुळे एप्रिलच्या मध्यावरच जिल्ह्यातील २० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला आहे.

अहमदनगर : दुष्काळस्थिती, पावसाने दिलेला ताण, मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणातून मराठवाड्याला सोडण्यात आलेले पाणी, उसाचे घटलेले क्षेत्र यामुळे एप्रिलच्या मध्यावरच जिल्ह्यातील २० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला आहे. सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या कारखान्यांनी ९२ लाख ७० हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून त्यातून १ कोटी १४ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा प्रवरा साखर कारखान्याचा ११.९५ टक्के असून सर्वाधिक साखर उत्पादन अंबालिका कारखान्याचे १२ लाख ५१ हजार क्विंटल झालेले आहे. यंदा तीव्र उन्हाळा असल्याने नगरसह मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या जिल्ह्यात पाण्याच्या टँकरचा आकडा ५६५ वर पोहोचला आहे. मुळा आणि भंडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आलेले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतीचा सोडा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे जवळपास ९० टक्क्यांनी उसाचे क्षेत्र घटले आहे. चाऱ्यासाठीही मोठ्या प्रमाणात ऊस तोडला होता़कुकडी, घोडमधून पिण्यासाठी पाणी सोडण्यात आल्याने दक्षिण जिल्ह्यात काही भागात उसाचे नगण्य क्षेत्र आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी पशुधन वाचवण्यासाठी खोडवा उसाचा चारा म्हणून वापर केला आहे. यामुळे पुढील हंगामासाठी जिल्ह्यात ऊसच नसल्याचे चित्र आहे. १७ तारखेला संगमनेर साखर कारखान्याच्या गाळपाचा समारोप झाला असून चालू हंगामात राहुरी, साईकृपा २ हे कारखाने सुरू होवू शकले नाहीत. नगर कारखाना सुरू झाला. मात्र, या ठिकाणी अवघे ४ हजार मेट्रीक टन गाळप झाले. (प्रतिनिधी)झालेले गाळपसंजीवनी- ५ लाख ५० हजार, कोपरगाव- ४ लाख ९२ हजार, गणेश- ३ लाख २३ हजार, अशोक- ४ लाख ९६ हजार, प्रवरा- ७ लाख ८७ हजार, श्रीगोंदा- ५ लाख ६४ हजार, थोरात- ८ लाख ७० हजार, ज्ञानेश्वर- ८ लाख ६ हजार, वृध्देश्वर- २ लाख ३४ हजार, मुळा- ६ लाख ८५ हजार, अगस्ती- ४ लाख ५१ हजार, केदारेश्वर- ४४ हजार, क्रांती- १ लाख २८ हजार, कुकडी- ५ लाख १८ हजार, नगर- ७ हजार, अंबालिका- १० लाख ७ हजार, गंगामाई- ६ लाख २५ हजार, साईकृपा- १ लाख ७५ हजार, प्रसाद- २ लाख ५८ हजार, जयश्रीराम- १ लाख ७१ हजार असे आहे. नाशिक विभागात नगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यातील कारखान्यांचा समावेश आहे. या विभागात चालू हंगामात १०४ लाख २४ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप झालेले आहे. यातून ११३ लाख ६१ हजार मेट्रीक टन साखर उत्पादन झालेले आहे. या दोन जिल्ह्यांचा साखर उतारा १०.९४ टक्के निघालेला आहे.