अहमदनगर : इयत्ता दहावी व बारावीचे निकाल लागल्यानंतर तहसील कार्यालयात नागरिक व विद्यार्थी विविध प्रकारच्या दाखल्यासाठी येतात. त्यांना तात्काळ दाखले द्यावेत, असा आदेश प्रांताधिकारी वामन कदम यांनी दिला.नगर तहसील कार्यालयासमोरील महा-ई सेवा केंद्र क्रमांक २१ उपविभागीय अधिकारी कदम यांनी बंद केले आहे. या ई-सेवा केंद्रातील तयार दाखल्यांचे वाटप तहसील कार्यालयात सुरू आहे. परंतु काही दाखले तयार झालेले नाहीत. बंद केलेल्या ई-सेवा केंद्रातील ज्या विद्यार्थी व नागरिकांचे दाखले मिळाले नाहीत अशा विद्यार्थी व नागरिकांसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थी व नागरिकांना दाखले मिळाले नाहीत, त्यांनी तक्रार निवारण केंद्रात तक्रार नोंदवावी. या तक्रारीनुसार विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी इतर महा ई सेवा केंद्रामार्फत तात्काळ दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांसाठी तात्काळ मिळणार दाखले
By admin | Updated: July 3, 2014 00:58 IST