केडगाव : गुंडेगाव (ता. नगर) येथील सतत पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले. अनेक रस्त्यावर पाणी साचलेले आहे. यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते, ही बाब लक्षात येताच उद्योजक सतीश चौधरी व पत्नी ग्रामपंचायत सदस्य साधना चौधरी यांनी स्वखर्चाने गावठाण भागातील टकले दुकानदार लगतच्या रस्त्यावर स्वखर्चाने मुरमीकरण करण्यात आले आहे.
चौधरी म्हणाले, गुंडेगाव ग्रामपंचायतच्या वतीने यावर्षी मुरमीकरणासाठी तरतूद नसल्याने आम्ही लोकांची गैरसोय व आरोग्य लक्षात घेता सामाजिक बांधिलकी समजून मुरमीकरण केले आहे. २०२१-२२ या वित्तीय विकास आराखड्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत रक्कम ४ लाख ७८ हजार ४९८ रुपयांची वाडी वस्ती व गावठाण रस्त्यावर मुरमीकरण करणे यासाठी तरतूद करण्यात आली. हा निधी त्वरित खर्च करून पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते मुरमीकरण करावे, आशी मागणी सतीश चौधरी, शैलेश पिंपरकर, संजय भापकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.