अहमदनगर : भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतून जाणा-या नगर-सोलापूर महामार्गावरील नाक्यावर पथकर वसुलीच्या नावाखाली वाहन चालकांना दमदाटी करून त्यांची लूटमार करणा-या अकरा जणांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी मध्यरात्री अटक केली.अटक केलेल्यामध्ये पथकर वसुलीचा व्यवस्थापक अजय चाचा स्वामी (वय ३५ रा. इराणी रोड भिंगार) याच्यासह विजय शिवाजी चव्हाण (वय २१ रा़ दरेवाडी), अजय दिलीप कोळी (वय २३ रा़ लोढरे ता़ शिरपूर जि़ धुळे), संदीप रघुनाथ भोसले (वय ३२ रा़ दरेवाडी), मंगेश युवराज ओव्हळ (वय २२ रा़ हिवे ता़ करमाळा), पंकज राजू गवळी (रा़ गवळीवाडा, भिंगार), वाहिद लाला शेख (३६ सैनिकनगर, भिंगार), अनिल अंबादास अळसुदे (वय ३० रा़ वडारवाडी, भिगार) सागर राजू परदेशी (वय २५ रा़ भिंगार), राजेंद्र जयशिंग गोरे (रा़ रूईछत्तीसी ता़ नगर) व शुभम प्रताप लाहोट (वय २२ रा़ भिंगार) यांचा समावेश आहे़नगर सोलापूर रोडवरील कॅन्टोन्मेंट नाक्यावर पथकर वसुलीच्या नावाखाली दहा ते बारा जण ट्रकचालकांची गेल्या अनेक दिवसांपासून लूट करत करत होते़ ६० रूपयांची पावती देऊन ४०० ते ५०० रूपये ट्रकचालकांकडून घेतले जात होते़ जास्त पैसे न देणा-या चालकांना दमदाटी तर कधी मारहाणही केली जात होती. याबाबत थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील, हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, मन्सूर सय्यद, दिनकर नानेकर, लोळगे, रवींद्र कर्डिले, मनोज गोसावी, विजयकुमार वेठेकर, दत्तात्रय जपे, शंकर चौकधी यांच्या पथकाने रविवारी रात्री १ वाजता छापा टाकला. यावेळी ट्रकचालकांकडून दमदाटी करून पैसे वसुलीचे काम सुरूच होते़ यावेळी पोलीस पथकाने ११ आरोपींना ताब्यात घेतले़ आरोपींवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.पावती ६० ची वसुली ४०० चीभिंगार येथील पथकर नाक्यावर रात्रीच्यावेळी ट्रकचालकांना ६० रूपयांची पावती देत त्यांच्याकडून दमदाटी करून ४०० रूपये वसुली केले जात होते़ पैसे देणास विरोध करणाºयास थेट मारहाण केल्याचेही प्रकार समारे आले आहेत़ गुरूवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पथकर भरलेल्या ट्रकचालकांकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी हा प्रकार सांगितला.रात्रीतून लाखो रूपयांची वसुलीनगर-सोलापूर मार्गे रात्रीतून हजारो ट्रक व इतर जड वाहने प्रवास करतात़ या चालकांकडून जास्त पैसे घेऊन पथकरनाका चालक व त्याचे गुंड रात्रीतून लाखो रूपयांची वसुली करत होते़ असे असताना भिंगार कॅम्प पोलीस काय करत होते़ असाही प्रश्न उपस्थित होत आहे़ अखेर स्थानिक गुन्हे शाखेने या वसुली रॅकेटवर छापा टाकला.नाका चालवितो कोण.. पैसे जातात कुठे ?कॅन्टोमेंन्ट बोर्ड च्या पथकर नाक्यावर पूर्वीपासून जास्त पैसे वसूल केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे़ मध्यंतरी हा नाका काही दिवस बंद होता़ मात्र तो पुन्हा सुरू झाला़ हा नाका कोणत्या ठेकेदाराला चालविण्यास दिला आहे आणि प्रत्यक्षात चालवितो कोण? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे़ तसेच नाक्यावर राजरोसपणे ट्रकचालकांची लूट होत असताना कॅन्टोन्मेंट प्रशासन डोळेझाक का करत होते़ रात्रीतून वसूल केलेले लाखो रूपये कुठे जात होते याचीही चौकशी व्हावी असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
कॅन्टोन्मेंट नाक्यावर ट्रक चालकांना लुटणा-या अकरा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 15:16 IST