केडगाव : नगर तालुक्यातील मल्हार निंबोडी विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. येथे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या गटाची सत्ता आली. मांडवे सेवा संस्थेच्या विशेष मागास प्रवर्ग जागेसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही जागा रिक्त राहिली. उर्वरित १२ जागांसाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मल्हार निंबोडी व मांडवे सोसायटीच्या निवडणुकीसाठी ७ मार्च रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. या मुदतीत मल्हार निंबोडी सोसायटीसाठी १३ जागांवर १३ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असून केवळ निवडीची औपचारिक घोषणा बाकी आहे. या ठिकाणी सर्वसाधारण जागेसाठी रामदास सुखदेव बेरड, बालचंद्र देवराम गवळी, बाबासाहेब लक्ष्मण कराळे, अशोक कारभारी कोहक, मारूती नामदेव जाधव, मच्छिंद्र रामभाऊ बेरड, मंगेश ठकसेन बेरड, भगवान भाऊसाहेब भोगाडे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जाती जमातीमधून बन्सी रामचंद्र पोटे, महिला राखीव मधून भामाबाई भानुदास ठोंबरे, नंदा सुनील गवळी, इतर मागास प्रवर्गातून आसाराम शंकर वाघ, विशेष मागास प्रवर्गातून रामदास लक्ष्मण जाधव आदींचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सरपंच शंकर बेरड, माजी सरपंच जयराम बेरड, मंगेश बेरड, दत्तात्रय पोकळे आदींनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा कर्डिले यांनी शुक्रवारी (दि.५) बुऱ्हाणनगर येथे सत्कार केला. यावेळी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, संचालक बाबासाहेब खर्से, रेवननाथ चोभे, रभाजी सूळ आदी उपस्थित होते.
मांडवे येथे सर्वसाधारण जागेसाठी बाळासाहेब मोहन निमसे, ज्ञानेश्वर रामदास निमसे, पांडुरंग राणू निमसे, बाबासाहेब मंजाबापू निमसे, महादेव कुंडलिक निक्रड, बाळासाहेब रंगनाथ निमसे, प्रकाश सदाशिव निमसे, बहिरू धोंडीबा निमसे, शिवाजी चिमाजी निमसे, पंढरीनाथ मुरलीधर निमसे, ज्ञानदेव भिमा निमसे, गंगाधर लक्ष्मण निक्रड, विनोद ज्ञानदेव निमसे, सुभाष भाऊ निमसे, अनुसूचित जाती जमातीमधून जनार्दन रघुनाथ गांगर्डे, चिमा गेणू आरू, महिला राखीव- छाया विलास निमसे, सुरेखा दत्तात्रय निक्रड, द्रौपदी लक्ष्मण निक्रड, जया आबासाहेब निमसे, इतर मागासवर्ग- रत्नाकर फकिरा पंडित, निर्मला गंगाधर पंडित, ज्ञानेश्वर रामदास निमसे, रूपाली सुभाष निमसे आदींचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
---
मांडवेत दुरंगी लढत..
मांडवे सेवा संस्था निवडणुकीत १२ जागांसाठी २४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या ठिकाणी दुरंगी लढत रंगणार आहे. येथे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब निमसे यांच्याविरूद्ध माजी सरपंच सुभाष निमसे यांच्या गटात लढत होणार आहे.
फोटो ओळी ०५ सेवा संस्था
मल्हार निंबोडी (ता.नगर) संस्थेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करताना माजी मंत्री शिवाजी कर्डिले.