शहरं
Join us  
Trending Stories
1
"BMC आयुक्त कोण आहे, नाव लिहून ठेवा; कंट्रोल मुख्यमंत्र्यांकडेच आहे..."; मनोज जरांगेंचा इशारा
2
शरद पवारांचा 'सुसाईड बॉम्ब' म्हणून जरांगेंकडे पाहतात; भाजपा आमदार संजय केनेकरांचं खळबळजनक विधान
3
Manoj Jarange Patil Morcha Update Live: आम्हाला राजकारण करायचे नाही, फक्त आरक्षण पाहिजे, मराठा आंदोलकांना त्रास देऊ नका- मनोज जरांगे
4
राजिनाम्यानंतर जगदीप धनखड यांचा पेन्शनसाठी अर्ज, कोण कोणत्या सुविधा मिळणार?
5
Delhi Murder Video: भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, सेवेकऱ्याला जीव जाईपर्यंत मारलं; दिल्ली हादरली
6
अमेरिकेचे नवं पाऊल...भारताला बसू शकतो मोठा झटका; १.६ अब्ज डॉलर्स गुंतवणूक धोक्यात
7
'शोले'मधून सचिन पिळगावकरांचा 'हा' सीन केलेला कट, पण फोटो आला समोर; अभिनेत्याला वाटलेलं वाईट
8
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता वाढताच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल पहिला निर्णय
9
जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
10
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
11
Dilshan Madushanka ODI Hattrick : या पठ्ठ्यानं अखेरच्या षटकात हॅटट्रिकचा डाव साधत फिरवली मॅच
12
रितेश देशमुखचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाला- "मनोज जरांगेजी हे..."
13
"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
14
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
15
'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...
16
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
17
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
18
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
19
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
20
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..

धरण पाणलोटात मुसळधार

By admin | Updated: July 31, 2014 00:40 IST

राजूर/अकोले : भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोटात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पावसाचा धडाका सुरू असून, भंडारदरा पाणलोटातील रतनवाडी येथे पंधरा इंच पावसाची नोंद झाली.

राजूर/अकोले : भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोटात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पावसाचा धडाका सुरू असून, भंडारदरा पाणलोटातील रतनवाडी येथे पंधरा, घाटघर येथे साडेचौदा, तर पांजरे येथे साडेअकरा इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणात ६३२५ दशलक्ष घनफूट साठा झाला, तर निळवंडेही दोन टीएमसीपर्यंत पोहोचले. धुवाँधार होत असलेल्या अतिवृष्टीमुळे या धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सकाळी संपलेल्या चोवीस तासांत सव्वा टीएमसीहून अधिक नवीन पाण्याची आवक झाली, तर बुधवारी दिवसभरातील बारा तासांत ५२० दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होत धरणातील पाण्याने सहा टीएमसीचा टप्पा पार केला. मंगळवारीही दिवस-रात्र येथे मुसळधार पाऊस बरसला. सह्याद्रीच्या डोंगररांगांवरून फेसाळते धबधबे कोसळत आहेत. कोलटेंभे येथील ‘गायमुख’, रतनवाडीचा ‘नेकलेस’, सांधनदरीजवळचा आकाशाकडे झेपावणारा ‘गिरणाई’आदी धबधबे चैतन्यात न्हाले असून हे सौंदर्य व कातळशिल्प अमृतेश्वर शिवालयावर सुरु असलेला मुसळधार सरींचा अभिषेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. सलग दुसऱ्या दिवशी जनजीवन विस्कळीत झाले आहे. भातखाचरे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. आढळा खोऱ्यातही मंगळवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. (तालुका प्रतिनिधी) गोदावरी दुथडी कोपरगाव: नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने दारणा धरणातून २७ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले़ नांदूूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात साठलेल्या या पाण्याचा विसर्ग ३१ हजार क्युसेक्सने गोदावरी नदीपात्रात होत होता़ त्यामुळे कोपरगावात गोदावरी नदी दुथडी भरून वाहुू लागली आहे़ मंगळवार व बुधवारी कोपरगावसह नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला़ दारणा व गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विशेष करून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे़ दारणात धरण ५ हजार ५३१ दशलक्ष घनफूट पाणी झाले आहे़ त्यामुळे दारणा धरणातून मंगळवारी दुपारीच २४ हजार ५९२ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले़ तेच बुधवारी दुपारी २७ हजार ५९२ येवढ्या क्युसेक्सने साडले गेले़ हे पाणी नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यात आल्यानंतर गोदावरी नदीपात्रात मंगळवारी रात्री दहावाजेपासून कोसळू लागले़ प्रथम ४ हजार ७७५ क्युसेक, बुधवारी पहाटे नऊ हजारने सोडले गेले़ दुपारी ११ वाजता पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला़ २५ हजार ५१५ क्युसेक्सने पाणी नदीपात्रात पडत होते़ नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने विसर्ग वाढविण्यात आला़ सायंकाळी पाच वाजता ३१ हजार १३० क्युसेक्स पाणी नदीपात्रात कोसळत होते़ पाणी आल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे़ कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे नदीवरील छोटापूल पाण्याखाली गेला़ त्यामुळे गुजरातकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली़ शेजारीच बांधण्यात आलेला नविन पूल, उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता़ परंतु प्रवाशांनी या पुलाचा वापर आज सुरू केला़ छोटी मोठी वाहने या पुलाचा वापर करून निघून जात होती़ कोपरगाव शहरात चारच्या सुमारास नदीपात्रातून हळू हळू पाणी पुढे सरकण्यास सुरूवात झाली़ अवघ्या काही मिनिटातच दोन्ही थड्या भरल्या गेल्या़ यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी शहरवासीयांनी मोठी गर्दी केली़ पुलावरून पाणी पाहणाऱ्या नागरिकांमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती़ शहरवासियांच्या वतीने नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई यांनी जलपूजन केले. मुळा धरण ३७ टक्क्याच्या पुढेराहुरी : पाण्याची आवक टिकल्यास मुळा धरण २ आॅगस्टपर्यंत निम्मे भरण्याची शक्यता व्यक्त क रण्यात येत आहे़ २६ टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणाकडे ४० हजार ८२० क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाने १० टीएमसीचा टप्पा पार केला आहे. हरिश्चंद्रगड, कोतूळ, पाचणे, आंबित, कामशेत आदी भागांत जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले़ बुधवारी सकाळपासून धरणाकडे आवक वाढल्याने सायंकाळी सहा वाजता मुळा धरणामध्ये १० हजार १७२ दशलक्ष घनफूट साठा झाला होता. १७ जुलै रोजी धरणात ४९३३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते़ पुनर्वसू नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने पाण्याची आवक ९००० क्युसेकवर गेली़ सध्या सुरू असलेल्या पुष्य नक्षत्रात पाणलोट क्षेत्रावर गेल्या तीन दिवसांत समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़ पावसात सातत्य राहिल्यास २ आॅगस्टपर्यंत धरण निम्मे भरण्याची शक्यता आहे. यंदाच्या पावसाळयात मुळा धरणात साडेपाच टीएमसी पाणी नव्याने आले़ मुळा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने गाळपेरधारक शेतकऱ्यांची धांदल उडाली़ नदीकाठी असलेले मका, कडवळ, बाजरी ही पिके कापण्यासाठी शेतकरी वर्ग सरसावला़ आग्रेवाडी, दरडगाव आदी भागात चारा कापणीच्या कामाला वेग आला आहे़ मुळा नदीला पूर आल्याने मांडवे पूल पाण्याखाली गेला असून पारनेर व संगमनेर या तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे़ शेतीसाठी आवर्तन!कुकडीमधून पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व करमाळा या तालुक्यांना पिण्यासाठी १ हजार क्युसेसने पाणी कालवा सोडला आहे. घोड धरणात २७ हजार क्युसेसने पाण्याची आवक सुरू झाल्याने घोडचे आवर्तन सोडले जाणार आहे. कुकडी आणि घोडचे पिण्याचे आवर्तन शेतीसाठी केले जाणार आहे.पावसाने केली मातकुकडी पाणलोट क्षेत्र व लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने हवालदिल परिस्थिती निर्माण झाली होती. पिण्याचे आवर्तन राजकीय ऐरणीवर दीड महिन्यापासून होते परंतु धरणाचे दरवाजे वर होत नव्हते अखेर पाणलोट क्षेत्रात ढगफुटी झाली. प्रशासनाला काही तासातच धरणाचे दरवाजे वर करावे लागले. लाभक्षेत्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आणि समस्यांवर पावसानेच मात केली. येडगाव, वडज धरणे ओव्हरफ्लोश्रीगोंदा : कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रात धुवाँधार पाऊस कोसळला आहे. ३० जुलै दुपारी ४ वाजे अखेर येडगाव, वडज धरणे ओव्हरफ्लो झाली असून, घोड नदीत २७ हजार ५०० तर कुकडी कालव्याद्वारे १ हजार क्युसेसने पाणी सोडले आहे, अशी माहिती कुकडी प्रकल्प विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता यादवराव खताळ यांनी दिली. घोड नदीत येडगावमधून २० हजार तर वडजमधून ७ हजार ५०० क्युसेसने पाणी सोडले आहे. त्यामुळे घोड धरणात झपाट्याने पाणी येणार आहे. घोड नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कुकडी प्रकल्पातील धरणामध्ये एकूण १४.२६ टीएमसी (४७ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी २० टीएमसी (६८ टक्के) पाणी साठा होता. पावसाचे प्रमाण पाहता दोन दिवसात गेल्या वर्षी इतका पाणीसाठा होणार आहे. कुकडी प्रकल्पातील सर्वात जादा क्षमता असलेल्या डिंबे धरणात ६.३ टीएमसी (५० टक्के) पाणी आले आहे. माणिकडोह धरणात ३.१९ टीएमसी (३१ टक्के) तर पिंपळगाव जोगे धरणात १.०९ टीएमसी (२८ टक्के) इतका पाणीसाठा झाला आहे. येडगाव धरणात सोडलेले पाणी बंद करण्यात आले आहे. आ. बबनराव पाचपुते म्हणाले की, कुकडीचे पिण्यासाठी सोडलेले आवर्तन पिकासाठी करण्यात यावे तसेच घोडचे आवर्तन सोडावे त्यासाठी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांना भेटणार आहे. कुकडी कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी पाऊस व धरणातील पाणीसाठा विचारात घेऊन कुकडी व घोडचे पिकांना तातडीने आवर्तन द्यावे याकडे मंगळवारीच लक्ष वेधले होते.मुळा धरणातील पाण्याने दहा टीएमसीचा टप्पा पार केल्याने पिण्याचे पाणी व उद्योगधंद्यांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे़ यापुढील काळात जमा होणारा पाणीसाठा शेतीसाठी उपयुक्त ठरेल़- दिलीप नवलाखे, उपविभागीय अभियंतानिळवंडे धरणाच्या पाणलोटातही जोरदार पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे या धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे. कळसूबाई शिखराच्या परिसरासही अतिवृष्टीचा तडाखा सुरूच असल्यामुळे प्रवरेची उपनदी म्हणून समजल्या जाणाऱ्या कृष्णावंतीलाही आता पूर आला आहे. वाकी तलावाचा ओव्हरफ्लो संध्याकाळी सहा वाजता १५७४ क्युसेक होता. हे सर्व पाणी निळवंडे धरणात साठविले जात आहे. निळवंडे धरणात सायंकाळी सहा वाजता १८७७ दशलक्ष घनफूट इतका साठा झाला होता.