शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिकतेमुळे गोदावरी दूध संघाचा राज्यात लौकिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:26 IST

कोपरगाव : आधुनिकतेला प्राधान्य देत असल्याने गोदावरी दूध संघाने राज्यात लौकिक प्राप्त केला असल्याचे गौरवोद्गार शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव ...

कोपरगाव : आधुनिकतेला प्राधान्य देत असल्याने गोदावरी दूध संघाने राज्यात लौकिक प्राप्त केला असल्याचे गौरवोद्गार शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी काढले.

कोपरगाव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघास भारत सरकारच्या पशुपालन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या राष्ट्रीय दुग्धविकास योजना २०२० -

२०२१ अंतर्गत व महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मुंबई यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या मिल्को स्कॅन एफटी - १ या यंत्रसामग्रीचे उद्‌घाटन तसेच संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या नूतनीकरण केलेल्या स्मृतिस्थळाचे उद्‌घाटन खासदार डॉ. सुजय विखे व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २९) करण्यात आले. त्याप्रसंगी खासदार लोखंडे बोलत होते. प्रारंभी संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी स्वागत केले.

विखे म्हणाले, नामदेवराव परजणे अण्णा यांच्या प्रेरणेतून संघाच्या कार्यक्षेत्रात धवलक्रांतीचा उदय झालेला आहे. आधुनिकतेची कास धरून संघाने प्रगतीचा आलेख उंचावत नेलेला आहे. कार्यक्षेत्रातील हजारो कुटुंबांना या व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक हातभार लागलेला आहे. शेतीला पूरक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यवसायाने सर्वसामान्य, गोरगरीब शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग सापडला आहे.

राजेश परजणे म्हणाले, संघात नव्याने कार्यरत झालेल्या मिल्को स्कॅन एफटी - १ या अत्याधुनिक मशिनरीमुळे दुधातील स्निग्धांश, स्निग्धांशतेतर घटक, प्रोटिन, लॅक्टोज, ग्लुकोज, केसिन, डेनसिटी, लॅक्टीक, ॲसिड, युरिया, सायट्रीक ॲसिड, फ्रीजिंग पॉईंट, सेल्सियस, ॲसेडिटी आदींच्या तपासण्या करण्यास मदत होणार असल्याने कामकाजात यामुळे गती येणार आहे. शिवाय एका मिनिटातच रिझल्ट देण्याची क्षमतादेखील या यंत्रामध्ये आहे. यावेळी संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी आभार मानले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम पार पडला.