शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकावर चाकुने वार करुन 20 लाखांचा ऐवज लुटला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 20:17 IST

घटना संगमनेर तालुक्यातील कोंची घाटात घडली. 

अहमदनगर- आश्वी कडा जिल्हा बीड येथुन कापूस घेऊन जाणारा ट्रक चालकावर चाकुने वार करत ट्रकसह सुमारे वीस लाखांचा ऐवज  लुटल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कोंची घाटात घडली. 

या बाबत ट्रक चालक भरत भगवान उंडे वय 26 राहाणार उंडेवाडी बीड येथुन मालवाहतूक ट्रक क्रमांक एम एच 16 ए वाय 8557 मध्ये बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी कापूस  भरुन कडी जिल्हा म्हैसाना गुजरात येथील कापूस मिलला खाली करण्यासाठी घेऊन जात असताना कोल्हार घोटी राज्यमार्गावर लोणीच्या पुढे रात्री 8.45च्या सुमारास मागुन पाठलाग करत आलेल्या विनाक्रमांकाच्या मोटरसायकल वरील दोघांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला.

संशय आल्याने ट्रक चालकाने ट्रक तसाच पुढे नेला असता मोटरसायकल वरील आरोपीनी कोंची घाटात ट्रकला मोटरसायकल आडवी लावत तु मागे गाडीला धडक दिली असल्याचे सांगत बळजबरीने एकाने ट्रक मध्ये प्रवेश करत मोटरसायकल ट्रक च्या पुढे घेतली सुमारे एक किलोमीटर पुढे गेल्यावर  विनाक्रमांकाचा मोटरसायकलवर दोन जण आले असता पहिल्या मोटरसायकल वरील आरोपीने ट्रक मध्ये प्रवेश केला.

यानंतर ट्रक नाशिक महामार्ग वरील दोडी खु ता सिन्नर शिवारातील भारत पेट्रोल पंप समोर दुसऱ्या मोटरसायकल वरील दोघांनी प्रवेश करत चाकुने छातीवर वार करत मारहाण करून खिशातील आठहजार रुपये, मोबाईल काढुन घेत हातपाय बांधून मागे टाकुन अंगावर रग टाकला या नंतर ट्रक वळवुन रेल्वे गेट जवळुन वाकडीशिवारात जी पी एस सिस्टीम तोडुन टाकत .रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास शिर्डी  येथे गेट नंबर दोन समोर  आरोपीने चहा पिला या वेळी ट्रक चालकाने मला खुप त्रास होतो आहे. मला सोडा आशी विनंती केली असता आरोपीनी चालकाला साईबाबा रुग्णालया जवळ तीस रुपये देऊन खाली उतरून देत ट्रक सह पळ काढला.या वेळी ट्रक चालकाने पोलीस स्टेशन ला माहिती दिली. 

शिर्डी पोलीसांनी घटनेची माहिती आश्वी पोलीस स्टेशन ला दिली असता आश्वी पोलीसांनी ट्रक चालकाच्या जबाबा वरुन सुमारे तेरा लाख रुपये किंमतीचा माल ट्रक सुमारे सातलाख रुपये किंमतीचा कापूस, आठ हजार रुपये रोख  व मोबाईल  असा सुमारे वीस लाखांचा ऐवज  लुटीचा गुन्हा दाखल करत आरोपी च्या शोधात आश्वी  पोलीस  स्टेशन चेपथक रवाना झाले आहे.

टॅग्स :RobberyचोरीAhmednagarअहमदनगर