शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्या जखमी

By admin | Updated: April 4, 2017 16:09 IST

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शेळीवर हल्ला करणाऱ्या बिबट्यावरच सात कुत्र्यांनी जोरदार हल्ला चढवित त्यास जखमी केले.

आॅनलाईन लोकमतदेवळाली प्रवरा (अहमदनगर), दि़ ४ - राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शेळीवर हल्ला करणाऱ्या बिबट्यावरच सात कुत्र्यांनी जोरदार हल्ला चढवित त्यास जखमी केले. जखमी बिबट्याला जेरबंद करून उपचार करण्याची कामगिरी वन खात्याला करावी लागली़ बाळासाहेब गाढे यांच्या वस्तीवर शेळीवर केलेला हल्ला बिबट्याच्या अंगलट आला़ बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याचे लक्षात येताच कुत्र्यांनी एक जूट दाखवित त्याला घेरले़ शेळीवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली़ कुत्र्याच्या हल्ल्यात बिबट्या जखमी झाला़वन क्षेत्रपाल यु़बी़वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जी़एऩलोंढे, डी़एस़मेहेत्रे, एम़एम़मोरे, प्रदीप कोहकडे, लक्ष्मण किनकर, बी़पी़आडसुरे, यु़पीख़राडे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ तातडीने राहुरी येथून पिंजरा आणून त्यात बिबट्याला जेरबंद करण्यात आले़ बिबट्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले़ उपचारानंतर बिबट्याला डिग्रस येथील रोपवाटिकेत हलविण्यात आले़ बिबट्याचा काही दिवस मुक्काम डिग्रस येथे राहणार आहे़लपण्याची ठिकाणे कमी झाल्याने बिबट्याची भटकंती वाढली आहे़ भक्ष्य मिळविण्यासाठी बिबट्याची भटकंती सुरू आहे़ राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर आहे़ गेल्या आठवड्यात कडू वस्ती व दवणगाव रस्त्यालगत बिबट्या आढळला होता़