कोरोनाचे रुग्ण कमी झालेले असले तरीही कोरोनाचे संकट टळलेले नाही.
बेजबाबदारपणे वागल्यास पुन्हा कोरोनाची लाट येऊ शकते.
अशाप्रकारच्या जागतिक महामारीमध्ये एकापेक्षा अनेक लाटा येणे अपेक्षित असते.
महामारीचा अंत होण्यासाठी सर्व १८ वर्षांवरील लोकांनी कोविड लसीकरण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे प्रशासनाने व सरकारने जरी लॉकडाऊन पूर्णपणे उठवले असले तरी त्याचा अर्थ मास्क न घालणे, गर्दी करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, गर्दीचे कार्यक्रम आयोजित करणे असा घेणे घोडचुका ठरतील.
व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्या दुकानांमध्ये, आस्थापनांमध्ये कोणालाही विनामास्क प्रवेश देऊ नये. लोकांना गर्दी करण्यास प्रतिबंध करावा. स्वेच्छेने संध्याकाळी वेगवेगळ्या भागातील दुकाने आळीपाळीने बंद ठेवल्यास बाजारपेठेत होणारी अनावश्यक गर्दी टाळता येईल.
कोरोनापासून बचावासाठी खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- मास्क वापरणे (तीन पदरी मास्क, रुमाल, स्कार्फ व पदर नाही)
- हात वारंवार साबणाने धुणे / सॅनिटायझर लावणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे.
- कोविड लसीकरण करून घेणे.